शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार प्राधिकरण कागदावरच

By admin | Updated: July 20, 2015 01:42 IST

पोलिसांची एकतर्फी, बेकायदेशीर कारवाई आणि अन्यायाबाबत नागरिकांना दाद मागण्यासाठी स्थापन केलेल्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अस्तित्व केवळ कागदावरच

जमीर काझी, मुंबईपोलिसांची एकतर्फी, बेकायदेशीर कारवाई आणि अन्यायाबाबत नागरिकांना दाद मागण्यासाठी स्थापन केलेल्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अस्तित्व केवळ कागदावरच राहिलेले आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील बनविलेल्या प्राधिकरणाच्या कार्यालयासाठी अद्याप जागादेखील देण्यात आलेली नाही. कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या कर्मचारी वर्गाचीही अजून प्रतीक्षा आहे.राज्यभरातील जनतेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या छळाबाबतची न्यायालयीन चौकशी करून निर्णय देण्याचे अधिकार प्राधिकरणाला आहेत. त्यामुळे नागरिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्याचे कामकाज तातडीने सुरु होण्याची गरज आहे. गृह विभागाने मुलभूत बाबींची पूर्तता न केल्यामुळे प्राधिकरणाच्या काम अद्यापही सुरु होऊ शकलेले नाही. पोलीस सुधारणा अधिनियमांतर्गत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. ए. व्ही. पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांच्या समितीची स्थापना दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली. त्यात राज्याचे अप्पर महासंचालक (आस्थापना) पदसिद्ध सदस्य सचिव आहेत. परंतु गृह विभागाच्या दुर्लक्षामुळे ही समिती केवळ नावापुरती उरली आहे. पोलिसांकडून निरपराध नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत नागरिकांकडून रोष व्यक्त होतो. त्यामुळे २६/११ च्या घटनेनंतर तत्कालिन सरकारने पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र पोलीस सुधारणा अधिनियम २०१४ बनविले. त्यात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी अधिनियमाच्या २२(प)२ कलमांतर्गत महाराष्ट्र तक्रार प्राधिकरण स्थापण्याची तरतूद करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मे महिन्यात या प्रलंबित प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यात न्या.पोतदार यांच्याशिवाय निवृत्त अप्पर महासंचालक पी. के. जैन व आर. आर. सोनकुसरे, निवृत्त सनदी अधिकारी रामाराव आणि पोलीस मुख्यालयातील आस्थापना विभागाचे अप्पर महासंचालक व्ही.डी.मिश्रा यांचा समावेश आहे.