शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानच्या विरोधात तक्रार दाखल

By admin | Updated: June 21, 2016 21:38 IST

आघाडीचा चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या अडचणीत राष्ट्रवादीच्या तक्रारीमुळे वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 21 - आघाडीचा चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या अडचणीत राष्ट्रवादीच्या तक्रारीमुळे वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिलांसाठी लज्जास्पद ठरेल, असे कथित वक्तव्य सलमानने केल्यामुळे मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी   महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या वतीने सीताबर्डी पोलिसांकडे निवेदनवजा तक्रार अर्ज देऊन सलमानविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शूटिंगमुळे आलेल्या थकव्याने बलात्कार झालेल्या महिलेसारखी अवस्था झाल्याचे वाटते, असे वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केले. त्यामुळे सर्वत्र वादळ उठले आहे. सलमानच्या या वक्तव्याचे पडसाद नागपुरातही उमटले असून, मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ आणि स्थानिक नेत्या नूतन रेवतकर यांच्या नेतृत्वात पन्नासावर महिलांनी झाशी राणी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करून सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. तेथे रेवतकर यांनी सलमानविरुद्ध निवेदन दिले. सलमानच्या वक्तव्यामुळे सर्वच समाजातील महिलांचा अपमाण झाला असून, त्याच्या या बेताल वक्तव्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महिलांसाठी लज्जास्पद ठरणारे हे वक्तव्य करणा-या सलमान खानविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादीच्या महिला तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.राष्ट्रवादीच्या या पवित्र्यामुळे सलमानविरुद्ध गुन्हा दाखल होणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याअनुषंगाने सीताबर्डीचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही या प्रकरणाची चौकशी करीत आहोत. निवेदनात सलमानने हे वक्तव्य कुठे आणि कधी केले, ते स्पष्ट नाही. त्यामुळे चौकशी करूनच पुढे काय ते ठरवू, असे बंडीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.