शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या ‘बोलबच्चनगिरी’ची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

By admin | Updated: December 9, 2014 00:55 IST

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर विकास कामांना ४० टक्के कपात लागू करण्याबाबतची घोषणा करून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी ओढवून घेतली आहे.

४० टक्के कपातीच्या घोषणेवर मुख्यमंत्री नाराजनागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर विकास कामांना ४० टक्के कपात लागू करण्याबाबतची घोषणा करून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी ओढवून घेतली आहे. खडसे हे वरचेवर वादग्रस्त विधाने करून आपल्याला अडचणीत आणत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे समजते.राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरी सध्या वेगवेगळ््या खात्याने किती रक्कम खर्च केली आहे त्याचा आढावा घेणे सुरू आहे. तो झाल्यावर मग निधीचे नियोजन कसे करता येईल ते पाहून आणि कामाची प्रगती तपासून मग कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ही रुटीन बाब असून त्याची जाहीर वाच्यता केली जात नाही. या घडीला कपातीचे कुठलेही आदेश काढलेले नसताना खडसे यांनी कपातीची घोषणा केली. वस्तुत: खडसे यांच्याकडे अर्थ व नियोजन खाते नाही. मुख्यमंत्री दिल्लीला असल्याने केवळ पत्रकार परिषद घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. खडसे यांच्या घोषणेमुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा-शिवसेनेचे आमदार कपातीच्या कल्पनेने धास्तावले होेते. मंत्र्यांकडे कामे घेऊन येताना कपातीमुळे आपली कामे रखडणार ंिकंवा कसे याची विचारणा करीत होेते.खडसे यांनी फडणवीस यांच्या निवडीनंतर लागलीच बहुजन मुख्यमंत्री व्हायला हवा होता, असे विधान केले होते. मराठी शाळांमध्ये उर्दू भाषा शिकवण्याचे विधान करून शिवसेनेच्या नाराजीत भर घातली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय सोडून बोलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खडसे यांची कानउघाडणी केली होती. खडसे यांना त्यांच्या बेलगाम वक्तव्यांकरिता पक्षश्रेष्ठींकडून लवकरच समज दिली जाईल, असे बोलले जाते. (विशेष प्रतिनिधी)परस्पर आदेश काढलेशेतकरी मोबाईलचे बिल भरतात तर वीज बिल का भरत नाहीत, असे बोलून त्यांनी सरकारवर शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेतली. मुख्यमंत्र्यांकडील नगरविकास खात्याच्या अधिकारावर अतिक्रमण करणारे आदेश परस्पर काढले. ट्रान्सफॉर्मरच्या विषयावरून आमदारांमधील असंतोषाला खतपाणी घालण्याचे काम केले होते.