पुणे : महापालिकेकडून बीओटी तत्वावर उभारलेल्या युनीपोलची मुदत संपल्यानंतरही ग्रामविकास आणि जलसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या सुप्रा पब्लिसिटी प्रा. लि. या जाहिरात कंपनीला बेकायदेशीररित्या पाच वर्षांची मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणी काँग्रेसने आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे.महापालिकेने २००५ मध्ये मंगेश एन्टरप्रायजेस व सुप्रा या कंपनीला बीओटी तत्वावर जाहिरातींचे युनीपोल उभारण्याची परवानगी दिली होती. या संदर्भात पाच वर्षांच्या कराराची मुदत २०१०मध्ये संपली. त्यानंतर नवीन जागा वाटप नियमावली व जाहिरात धोरणानुसार निविदा काढून आणि त्या निविदांना स्थायीची मान्यता घेणे अपेक्षित होते, अशी माहिती विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)
पंकजा मुंडेंच्या कंपनीविरोधात आयुक्तांकडे तक्रार
By admin | Updated: February 10, 2015 02:24 IST