शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमीर खानविरुद्ध काँग्रेसचीही तक्रार

By admin | Updated: February 23, 2017 04:49 IST

राज्यातील ११ जिल्हा परिषदा आणि १० महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानादिवशी

मुंबई : राज्यातील ११ जिल्हा परिषदा आणि १० महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानादिवशी मतदारांना प्रभावित करणारी व भाजपाचा अजेंडा पुढे नेणारी जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्याबद्दल, अभिनेता आमीर खान, भारतीय जनता पक्ष आणि मुंबई फस्ट या एनजीओच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, अशी तक्रारवजा मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांना भेटून सावंत यांनी तक्रार दिली. मुंबई फस्ट ही एनजीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वॉररूम’साठी काम करत आहे, असे या एनजीओच्या वेबसाइटवरच म्हटले आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी ‘पारदर्शकता व परिवर्तन’ हा शब्द सगळीकडे प्रचारात वापरला होता. सदर जाहिरातीतदेखील पारदर्शकता व परिवर्तन या शब्दाचा वापर केला गेला, असेही सावंत यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ४८ तास आधी राजकीय पक्षांच्या जाहिराती इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमातून प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाने बंदी घातली होती. मात्र, मुंबई फर्स्ट या संस्थेने निवडणूक आयोगाचा आदेश डावलून भाजपाला मदत करण्यासाठी ‘पारदर्शकता’ आणि ‘परिवर्तन’ या मुद्द्यांवर मतदान करा, अशा जाहिराती मराठी हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात छापल्या. जाहिरात बंदीच्या निर्णयातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न भाजपाने या जाहिरातींद्वारे केला असून, कायद्यातून पळवाट शोधणे ही गुन्हेगारी स्वरूपाची प्रवृत्ती भाजपाची असल्याची टीका सावंत यांनी केली. (प्रतिनिधी)