शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेपूर्वी कामे मंजुरीची स्पर्धा

By admin | Updated: July 24, 2014 01:06 IST

निवडणुकीचे वर्ष असल्याने आचारसंहितेपूर्वी विकास निधीतून (आमदार निधी) कामे मंजूर करून घेण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांमध्ये स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेत कामठीचे भाजपचे आमदार चंद्रशेखर

आमदार निधी: खर्चात बावनकुळेंची आघाडीचंद्रशेखर बोबडे - नागपूरनिवडणुकीचे वर्ष असल्याने आचारसंहितेपूर्वी विकास निधीतून (आमदार निधी) कामे मंजूर करून घेण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांमध्ये स्पर्धा लागली आहे. या स्पर्धेत कामठीचे भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे अव्वल ठरले आहेत. त्यांनी प्रस्तावित केलेल्या सर्व कामांच्या प्रस्तावांना नियोजन विभागाकडून प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.आमदारांना दरवर्षी दोन कोटी रुपये विकास निधी प्राप्त होतो. आमदारांनी प्रस्तावित केलेल्या कामांवर तो खर्च केला जातो. मिळणाऱ्या रक्कमेच्या दीडपट कामे प्रस्तावित करण्याचे अधिकार आमदारांना असतात. निर्धारित निधीपेक्षा जास्त निधीची कामांसाठी पुढच्या वर्षीच्या निधीतून रकमेची तरतूद केली जाते. शेवटच्या वर्षी मात्र ही सवलत दिली जात नाही.नागपूर जिल्ह्यात एकूण १२ आमदार आहेत. त्यापैकी सहा शहरात आणि सहा ग्रामीणमध्ये असून प्रत्येकांने मागील चार वर्षातील त्यांच्या विकास निधीचा विनियोग केला आहे. यंदा प्रत्येकाला २ कोटी या प्रमाणे २४ कोटींच्या निधीपैकी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ६६ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे. यातून गेल्या वर्षीच्या अतिरिक्त कामांसाठी निधी वळता करण्यात आला. उर्वरित रकमेतून करावयाच्या कामांसाठी सर्वच आमदारांनी विविध विकास कामांचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठविले आहेत. प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी घेणे, निविदा काढणे आणि नंतर कामाला सुरुवात करणे ही नंतरची प्रक्रिया आहे. या संपूर्ण प्रक्रियेला सरासरी एक महिन्याचा वेळ लागतो. मात्र यंदा निवडणुकीचे वर्ष असून १५ आॅगस्टपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच आमदार प्रयत्नशील आहेत. यात कामठीचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडी घेतली आहे. २०१४-१५ या वर्षात दोन कोटींचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी ६९ लाखांचा निधी २०१३-१४ या वर्षाच्या कामांसाठी वळता करण्यात आल्यावर उर्वरित सर्व म्हणजे सरासरी १ कोटी ३१ लाखांच्या कामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून निविदे प्रक्रियेपर्यंत त्यांचे काम आले आहे. आमदार देवेंद्र फडणवीस, विकास कुंभारे, सुधीर पारवे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्याही उर्वरित विकास निधीतील कामांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत.अ. आमदार                        शिल्लक निधी          आलेले प्रस्ताव१) चंद्रशेखर बावनकुळे           १ कोटी                 ३१ लाख पूर्ण२) अनिल देशमुख                 १ कोटी                ४२ लाख पूर्ण३) विजय घोडमारे               १ कोटी ४२ लाख       १ कोटी २७ लाख४) सुधीर पारवे                   १ कोटी                  ५५ लाख पूर्ण५) सुनील केदार               १ कोटी ८० लाख        १ कोटी २६ लाख६) आशीष जयस्वाल          १ कोटी ४० लाख        १ कोटी २८ लाख७) नितीन राऊत              १ कोटी ४० लाख         ५० लाख८) कृष्णा खोपडे               १ कोटी ६६ लाख          १ कोटी ३ लाख९) सुधाकर देशमुख १ कोटी ६८ लाख १ कोटी ४५ लाख१०) दीनानाथ पडोळे १ कोटी ८० लाख १ कोटी ७५ लाख ११) देवेंद्र फडणवीस १ कोटी ६५ लाख १ कोटी ५५ लाख१२) विकास कुंभारे १ कोटी ८० लाख १ कोटी ७० लाख