शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

विमानतळासाठी सप्टेंबरनंतर सक्तीने भूसंपादन

By admin | Updated: September 23, 2014 05:10 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन करण्यासाठी दिलेल्या नोटिसांची मुदत ३0 सप्टेंबर रोजी संपत आहे.

कमलाकर कांबळे, नवी मुंबईआंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन करण्यासाठी दिलेल्या नोटिसांची मुदत ३0 सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून केंद्र शासनाच्या नव्या भूसंपादन कायद्यान्वये सक्तीने जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. जमिनी सक्तीने संपादित झाल्यास संबंधितांना सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजचा लाभ मिळणार नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार आहेत. त्यापैकी सिडकोच्या ताब्यात सध्या १५७२ हेक्टर जमीन आहे. सिडकोला बारा गावांसह त्यांच्या १० गावठाणांतील ६७१ हेक्टर जमीन संपादित करायची आहे. त्यासाठी जुन्या भूसंपादन अधिनियम १८९४ अन्वये क्रमांक ४ च्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापैकी वडघर आणि दापोली गावाच्या नोटिसांची मुदत सोमवारी संपली. तर पारगांव डुंगी, ओवळा, कोपर, तरघर व वाघिवली या गावांची मुदत ३0 सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून केंद्राच्या नव्या भूसंपादन कायद्यान्वये विमानतळ प्रकल्पाला आवश्यक असलेल्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. नव्या कायद्यानुसार जमिनी संपादित केल्यास संबंधित प्रकल्पग्रस्तांना सिडकोच्या २२.५ टक्के भूखंड व इतर पुनर्वसन पॅकेजचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्यांनी आतापर्यंत भूसंपादनासाठी संमीतपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांनी ती उर्वरित दिवसांत तातडीने सादर करावीत, असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी केले आहे.