शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उद्योगातील शेतकर्‍यांना मिळणार नुकसान भरपाई

By admin | Updated: June 16, 2014 22:12 IST

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या रेशीम उद्योगातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात दिले.

अकोला : यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या रेशीम उद्योगातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात दिले. विधान परिषदेचे आ. डॉ. रणजित पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेली गारपीट आणि हवामानातील बदलामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. याचा फटका वाडेगाव परिसरासह बाळापूर आणि पातूर तालुक्यातील रेशीम प्रकल्पांनाही बसला होता. ५0 टक्क्यांपेक्षा जास्त प्रकल्पांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यात एकूण ७६ एकरावर तुती लागवड आहे; मात्र गारपिटीमुळे रेशीम प्रकल्पांचे नुकसान झाले असून, यामध्ये बीजकोश, अळ्यांसह पायाभूत सुविधांचाही समावेश आहे. रेशमी उद्योगातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आ. डॉ. रणजित पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. यावर मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी विधान परिषदेमध्ये ओलितापेक्षा दीडपट जास्त आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन दिले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी सात दिवसांच्या आत संपर्क साधण्याचे आवाहन आ. डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.