शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई द्या!

By admin | Updated: July 31, 2015 00:40 IST

ठाकुर्ली रेल्वे स्थानकानजीक असलेल्या मातृकृपा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

कोल्हापूर : एलबीटी बंद झाल्याने मनपाच्या हिश्श्याचे अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगाराचेही वांदे होणार आहेत. त्यामुळे एलबीटीला सक्षम पर्याय द्या, अशी जोरदार मागणी महापौर वैशाली डकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नगरसेवक व महापालिका कर्मचाऱ्यांनी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना केली. महापालिकेच्या मुख्य कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकाळी अकरा वाजता निघालेल्या मोर्चात तीन हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले. मोर्चानंतर महापालिकेचे कामकाज दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. एलबीटी रद्द झाल्याने राज्य शासनाकडून अनुदान कसे मिळणार, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित चुकणार आहे. कर्मचाऱ्यांचा पगार व विकासकामे खोळंबल्याने ‘स्मार्ट सिटी योजने’तील सहभागही रखडणार आहे. दैनंदिन खर्च भागविणेही महापालिका प्रशासनास मुश्कील होणार असल्याने एलबीटीसारखे शाश्वत उत्पन्न देण्याची हमी राज्य शासनाने द्यावी, अशा मागणीचे निवेदन महापौर वैशाली डकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संगीता चौगले यांना दिले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या विठ्ठल रामजी चौकात नगरसेवक व कर्मचाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. यावेळी नगरसेवक राजेश लाटकर, जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. जकात किंवा एलबीटी हा महापालिकेच्या हक्काच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. ‘एलबीटी रद्द’चा परिणाम विकासकामांसह किरकोळ दुरुस्त्यांवरही होणार असल्याचे मत कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी व्यक्त केले. उपमहापौर ज्योत्स्ना पवार-मेढे, नगरसेवक अजित पोवार, चंंद्रकांत घाटगे, शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, मुरलीधर जाधव, विजय चरापले, दिनकर आवळे, सुरेश सूर्यवंशी, विजय वणकुद्रे, आदींसह नगरसेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. (प्रतिनिधी)