शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

‘मुस्लिम’ बांधवांसाठी सामुदायिक विवाह सोहळा

By admin | Updated: May 18, 2016 01:29 IST

केतकेश्वर मंगल कार्यालयामध्ये प्रथमच मुस्लिम समाजातील बांधवांसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले.

वडापुरी : इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम युवक संघटना यांच्या वतीने केतकेश्वर मंगल कार्यालयामध्ये प्रथमच मुस्लिम समाजातील बांधवांसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले. या वेळी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांतील ९ मुस्लिम जोडप्यांचा विवाह पार पडला. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, अविनाश घोलप, मयूरसिंह पाटील, पद्मा भोसले, विलासराव वाघमोडे, अ‍ॅड. कृष्णाजी यादव, नानासाहेब शेंडे, लालासाहेब पवार, कांतिलाल झगडे, गणेश झगडे, भरत शहा, अशोक इजगुडे, कृष्णा ताटे, राहुल मखरे, प्रवीण माने, प्रशांत पाटील, भागवत भुजबळ, आबा शिंगाडे, अ‍ॅड. लक्ष्मण शिंगाडे, निवृत्ती गायकवाड, प्रताप पाटील, डी. एन. जगताप, अशोक शिंदे, भागवत गटकुळ, देवराज जाधव, संग्राम निंबाळकर, आबा वीर, शेखर पाटील, श्रीमंत ढोले, तुषार जाधव, तुषार खराडे उपस्थित होते.आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, ‘‘चॅरिटेबल ट्रस्टने व मुस्लिम युवकांनी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. ते अतिशय कौतुकास्पद आहे. तसेच, नववधू-वरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’’या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी तालुक्यातून ७ हजार लोक उपस्थित होते. इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम युवक संघटना यांच्या वतीने या विवाह सोहळयासाठी आलेल्या लोकांना प्रशस्त शामियान्यात स्वतंत्र जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आयोजकांच्या वतीने नवदाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्यवाटप करण्यात आले. या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्टचे तालुक्यातील पदाधिकारी, सदस्य व मुस्लिम युवक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.>हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘सामुदायिक विवाह सोहळा ही सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये काळाची गरज आहे. इंदापूर तालुका मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट व मुस्लिम युवक संघटना यांनी केलेला विवाह सोहळ्याचा उपक्रम चांगला आहे. तालुक्यातील सर्व मुस्लिम युवक एकत्र येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतला. याचा आदर्श सर्व समाजाने घ्यावा.’’