शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कम्युनिस्टांचे सरकार म्हणजे राजकीय हत्याकांड

By admin | Updated: June 22, 2017 05:44 IST

कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या पक्षांचे सरकार जिथे आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हत्याकांड घडतात.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या पक्षांचे सरकार जिथे आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हत्याकांड घडतात. विशेष म्हणजे या राजकीय हत्याकांडाचा कधी तपास होत नाही किंवा खुनीही सापडत नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कम्युनिस्टांवर टीका केली. ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार’ या पुस्तक प्रकाशनानंतर मुख्यमंत्री बोलत होते. पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा या राज्यात चार दशकांपासून कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्सवादी)ची सत्ता आहे. तर, १९९८पासून माणिक सरकार या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या राजवटीवर पत्रकार दिनेश कानजी यांनी लिहिलेल्या ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार’ या पुस्तकाचे स्वातंत्र्यवीर स्मारकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, अतुल भातखळकर, माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा खरा चेहरा आणि दाखवायचा चेहरा भिन्न आहे. देशविघातक शक्तींना प्रोत्साहन देणारे हे सरकार आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करून देशाच्या सुरक्षेशी खेळणारे आणि केंद्रातून येणारा निधी लुटणारे सरकार आहे. कम्युनिस्टांनी त्रिपुरातही राजकीय हत्याकांडे घडवली. दुर्गम प्रदेश असल्याने संपर्काच्या साधनांचा अभाव आणि मागासलेपणामुळे येथील भीषण वास्तव बाहेरच्या लोकांपर्यंत पोहचत नाही. त्रिपुरातील या अराजकतेचा या पुस्तकातून पर्दाफाश झाला आहे.माणिक सरकार म्हणजे ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील लखोबा लोखंडे आहे. या माणसांना मी एकेकाळी देवदूत समजत होतो. हे पुस्तक वाचल्यानंतर प्रतिमाभंजन होऊन माणिक सरकार यांचे खरे रूप समोर येते, असे भारतकुमार राऊत म्हणाले.