शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष यात्रेला संवाद यात्रेने उत्तर देऊ - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 28, 2017 03:06 IST

शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, तेच संघर्ष यात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही.

पिंपरी-चिंचवड : शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला जे जबाबदार आहेत, तेच संघर्ष यात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष होत नाही. तुमच्या संघर्ष यात्रेला आम्ही संवाद यात्रेतून उत्तर देऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप गुरुवारी झाला. या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या विविध योजनांचा पाढा वाचत विरोधकांना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, ज्यांनी पंतप्रधानांच्या पॅकेजचे पैसे खाल्ले, तेच आज संघर्ष यात्रा काढत आहेत. ज्या संघर्ष यात्रेने राज्यात सत्तापरिवर्तन घडविले ती गोपीनाथ मुंडेंनी काढलेली संघर्ष यात्रा खरी होती. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला आम्ही संवाद यात्रेतून उत्तर देऊ. खासदार, आमदार आणि पदाधिकारी २५ लाख शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधतील. शिवाय, ही संवाद यात्रा वातानुकुलीत बसने असणार नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते. ...तर व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हाकेंद्र सरकारने ११ लाख टन तूर खरेदी केली. तर राज्य सरकारने ४ लाख टन तुरीची खरेदी केली आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांनी सत्तेत असताना १३ लाख टन तुरीचे उत्पादन असताना केवळ २० हजार टन तूर खरेदी केली होती. २२ एप्रिलपर्यंत टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची सगळी तूर खरेदी केली जाईल. मात्र, व्यापाऱ्यांच्या तुरीचा दाणाही खरेदी केला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

म्हणून बुरूज ढासळले!सत्तेत असताना ते मालक असल्याच्या तोऱ्यात वावरले म्हणून त्यांचे बुरूज ढासळले. पिंपरी-चिंचवडमध्ये पवार, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण, सोलापुरात मोहिते-पाटील, इस्लामपूरला जयंत पाटील आणि सांगलीत पतंगराव कदम यांचे बुरूज ढासळले, असे मुख्यमंत्री म्हणाले.