शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
3
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
4
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
5
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
6
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
7
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
8
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
9
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
10
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
11
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
12
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
13
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
14
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
15
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!
16
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
17
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
18
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
19
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
20
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!

नेक्स्टविरोधात एमबीबीएस विद्यार्थ्यांचा उद्या कॉमन बंक

By admin | Updated: January 31, 2017 20:26 IST

विद्यार्थ्यांना नेक्स्ट (नॅशनल अ‍ॅक्झिट टेस्ट) परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्याच्या प्रस्तावित विधेयकाला देशातील सर्व एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 31 - विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेविना भारतात व्यवसाय करण्याची मुभा तर भारतात एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नेक्स्ट (नॅशनल अ‍ॅक्झिट टेस्ट) परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्याच्या प्रस्तावित विधेयकाला देशातील सर्व एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. याला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पाठिंबा दिला असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या बुधवारी नागपुरातील मेयो, मेडिकल व एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी महाविद्यालयात सामूहिक गैरहजर (कॉमन बंक) राहून विभागीय आयुक्तांना निवेदन देणार आहे.मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती वैद्यकीय विद्यार्थी संघटनेचे शीव जोशी यांनी दिली. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, डॉ. व्हाय. एस. पांडे, डॉ. प्रशांत राठी, अक्षय यादव व सदाफ आझम उपस्थित होते. शीव जोशी म्हणाले, विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेविना भारतात व्यवसाय करण्याची मुभा देण्याचा व भारतातील विद्यार्थ्यांनी साडेचार वर्षे एमबीबीएसची कठीण परीक्षा पास केल्यानंतर केवळ गुणवत्तेच्या नावावर नेक्स्ट परीक्षा घेणे चुकीचे आहे. याचा अर्थ भारतात देण्यात येणारे वैद्यकीय शिक्षण उच्च दर्जाचे नाही, असे केंद्र सरकारला वाटते का ?, भारतात शिक्षण घेणाऱ्यांना अशी दुजाभावाची वागणूक मिळणार असेल, तर भविष्यात विद्यार्थ्यांचा कल हा विदेशात शिक्षण घेण्यावर राहील. एकीकडे राष्ट्रीयत्व आणि स्वदेशी यांचे गुणगान गायचे आणि दुसरीकडे असे निर्णय घ्यायचे, हे खेदजनक आहे, असे परखड मत जोशी यांनी मांडले. यादव म्हणाले, रशिया, जर्मनी, चीन यांसह अन्य देशांतून वैद्यकीय पदवीप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना परराष्ट्र वैद्यकीय पदवी परीक्षा द्यावी लागते. यानंतरच ते देशात वैद्यकीय व्यवसाय करू शकतात. विधेयक लागू झाल्यास अशा देशांमधून शिकून आलेले विद्यार्थी कोणत्याही परीक्षेशिवाय भारतात वैद्यकीय व्यवसाय करू शकतील. हे भारतीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे.डॉ. व्हाय.एस. पांडे म्हणाले, हा निर्णय भारतात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुळावर उठणारा आहे. मुळात भारतीय विद्यार्थी विदेशात शिक्षण घेण्यास जाऊच नयेत, यासाठी शिक्षणक्षेत्राचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे. शासनाचा हा निर्णय विरोधाभासी आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ताच पहायची असेल तर एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा ही देशात एकच लागू करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. डॉ. अविनाश जोशी म्हणाले, नेक्स्ट परीक्षेला आयएमएचा विरोध असून या संदर्भात होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा आहे. उद्या बुधवारी सकाळी १० वाजता आयएमएमध्ये मेयो, मेडिकल व एनकेपी साळवे महाविद्यालयाचे एमबीबीएसचे विद्यार्थी एकत्र येऊन चर्चा करतील. नंतर ११ वाजता विभागीय आयुक्तांना निवेदन देतील.