शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्यासाठी समिती

By admin | Updated: July 18, 2016 04:47 IST

कार्यकर्त्यांवर दाखल खटले मागे घेण्याच्या दृष्टीने अशा खटल्यांची छाननी करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.

यदु जोशी,

मुंबई- राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमध्ये कार्यकर्त्यांवर दाखल खटले मागे घेण्याच्या दृष्टीने अशा खटल्यांची छाननी करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती खटल्यांचे संदर्भ तपासून ते मागे घेण्याबाबत निर्णय घेईल.या आंदोलनांप्रकरणी १ नोव्हेंबर २०१४ पूर्वी दाखल करण्यात आलेले सर्व खटले मागे घेण्याचा शासन आदेश १४ मार्च २०१६ रोजी काढण्यात आला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी भाजपा, शिवसेनेचे आमदार, प्रमुख नेते आणि कार्यकर्तेही करीत होते. ‘आपले सरकार आलेले असूनही खटले मागे घेतले जात नाहीत’, असा नाराजीचा सूर होता. असे खटले मागे घेण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून मंत्रालयात विधी व न्याय विभागाकडे जातात. मात्र, तेथे खटले मागे घेण्यासंदर्भात तातडीने निर्णय होत नसल्याच्याही तक्रारी होत्या. यावर मात्रा म्हणून आता मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून ही समिती खटले मागे घेण्याचा निर्णय घेईल. बरेचदा खटले मागे घेऊ नयेत, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाकडून केली जाते. यापुढे जिल्हा प्रशासन केवळ प्रस्ताव पाठविण्याचे काम करेल आणि त्याची नियमानुसार छाननी करुन निर्णय घेण्याचे अधिकार उपसमितीला असतील, असे सूत्रांनी सांगितले. उपसमितीचे अध्यक्षपद गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असेल. १९९९ पासून २०१४ पर्यंत आघाडीचे सरकार होते. त्या काळात भाजपा, शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर राजकीय, सामाजिक आंदोलनांमध्ये खटले दाखल करण्यात आले होते. आजच्या निर्णयाने ते रद्द होण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.