शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा गृहनिर्माणच्या अभिहस्तांतरासाठी समिती

By admin | Updated: January 6, 2016 02:00 IST

गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणातील कागदपत्रांची संख्या कमी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुंबई : गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणातील कागदपत्रांची संख्या कमी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेत आवश्यक ते बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी शेखर चन्ने, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता, सहकार विभागाचे उपसचिव डॉ. यशवंत गेडाम, सह नोंदणी महानिरीक्षक डॉ. संजय कोलते, मुद्रांक विभागाचे उपसचिव श्यामसुंदर पाटील आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, ‘मानीव अभिहस्तांतरणासाठी लागणारी कागदपत्रे, तसेच प्रक्रिया वेळखाऊ आहे. या प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल सुचवून ही प्रक्रिया अधिक जलद व सुटसुटीत होण्यासाठी गृहनिर्माण, महसूल आणि सहकार या तीन विभागांतील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक समिती तातडीने नियुक्त करावी. या समितीने सध्याचे नियम व त्यामध्ये आवश्यक असणारे बदल, तसेच या प्रक्रियेसाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात, जेणेकरून सदनिका खरेदी करणाऱ्यांना याचा लाभ होईल.’ (प्रतिनिधी)