शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

औषध खरेदीसाठी दीक्षितांची समिती

By admin | Updated: April 18, 2017 06:07 IST

औषध खरेदीत होणारे घोटाळे टाळण्यासाठी आणि या व्यवस्थेत संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी माजी पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती

अतुल कुलकर्णी, मुंबईऔषध खरेदीत होणारे घोटाळे टाळण्यासाठी आणि या व्यवस्थेत संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी माजी पोलिस महासंचालक प्रविण दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून यापुढे वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व औषध खरेदी या समितीमार्फतच केली जाणार आहे. या नेमणुकीबाबतचे वृत्त सगळ्यात आधी ‘लोकमत’ने दिले होते. या समितीच्या सदस्यपदी मुंबई महानगर रुग्णालयांचे निवृत्त संचालक डॉ. संजय ओक आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे निवृत्त माजी सहाय्यक संचालक डॉ. सुरेश सरवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. मात्र २९७ कोटींच्या औषध खरेदीत घोटाळे झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक आरोग्य विभागात दोन संचालक नेमण्याचे आदेश देऊनही तीन ते चार महिने झाले तरीही आरोग्य विभाग मात्र ही फाईल पुढे जाऊ देत नाही. त्याउलट माजी पोलिस महासंचालकांना या पदावर नेमण्याची ही राज्यातली पहिलीच घटना आहे.वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालये, संलग्नित रुग्णालये व आरोग्य पथकांकरिता यंत्रसामुग्री, औषधे व शल्योपचार सामुग्री (सर्जीकल साहित्य) खरेदी करण्यासाठी यापुढे ही राज्यस्तरीय खरेदी समिती काम करेल. या समितीने वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत लागणारी सामुग्री खरेदीसाठीची ई-निविदा प्रक्रिया राबविण्याच्या प्रक्रियेपासून संबंधीत खरेदीचा अंतिम निर्णय घेण्यापर्यंतची सर्व कार्यवाही पार पाडण्याचे अधिकारही याच समितीला देण्यात आले आहेत.यापूर्वी १५ मार्च २००० ते १७ मार्च २०१७ या कालावधीत काढण्यात आलेल्या सर्व आदेशांऐवजी आज १७ एप्रिल २०१७ रोजी काढण्यात आलेला आदेश यापुढे लागू राहील. ही राज्यस्तरीय खरेदी समिती नऊ सदस्यांची असेल. ज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक हे सदस्य सचिव असतील तर लेखा व कोषागार कार्यालयाने नामनिर्देशित केलेला संचालक दर्जाचा प्रतिनिधी, उद्योग सह संचालक, आरोग्य सवा संचालनालयाचा गट अ दर्जापेक्षा कमी नसलेला ज्येष्ठ अधिकारी आणि सहयोगी प्राध्यापक असे तिघे निमंत्रित सदस्य असतील.