शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांच्या तपासणीसाठी समिती

By admin | Updated: January 2, 2017 05:18 IST

राज्यभरातील शासकीय, अनुदानित आश्रमशाळेतील सोयी-सुविधांची तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे

पुणे : राज्यभरातील शासकीय, अनुदानित आश्रमशाळेतील सोयी-सुविधांची तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही समिती दर तीन महिन्यांनी जिल्ह्यांतील आश्रमशाळांचा आढावा घेऊन उपाय सुचवेल. तसेच त्याची अंमलबजावणीही करून घेणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, अपघात व अन्य कारणांनी मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत. यासंदर्भात रवींद्र तळपे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयाने २०१३ मध्ये आश्रमशाळांमध्ये निवासी सुविधा व इतर मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आश्रमशाळांमधील सुविधांबाबत डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालात आश्रमशाळांच्या सोयी-सुविधांसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार राज्य सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश आदिवासी विकास विभागाने काढला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समन्वय समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, कार्यकारी अभियंता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शिक्षण अधिकारी, प्रकल्प अधिकारी असे १३ अधिकारी, तर तालुका स्तरातील समितीत तहसिलदार, प्रकल्प अधिकारी, उपजिल्हा पोलिस अधिक्षक अशा ९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)