शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चितळे अहवालाच्या अंमलबजावणीसाठी समिती

By admin | Updated: August 26, 2014 03:17 IST

सिंचन क्षेत्रातील सुधारणांसाठी ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती नेमली

मुंबई : राज्याच्या सिंचन क्षेत्रातील सुधारणांसाठी ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. चितळे समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे १ मार्च २०१४ रोजी सादर केला होता. या अहवालावरील कार्यपालन अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत १४ जून रोजी मांडण्यात आला. त्या वेळी चितळे समितीने सुचविलेल्या सुधारणांच्या अंमलबजावणीस कटिबद्ध असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी नियोजन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यात वित्त, महसूल, कृषी व पणन, जलसंपदा, जलसंधारण, रोहयो, पाणीपुरवठा व स्वच्छता, वने, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन आदी विभागांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. चितळे समितीने सुचविलेल्यांपैकी ४२ सुधारणांच्या अंमलबजावणीचे काम ही समिती करेल. (विशेष प्रतिनिधी)