शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सागरी किनाऱ्यांच्या विकासासाठी समिती

By admin | Updated: October 20, 2015 02:51 IST

राज्याला तब्बल ७२० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभूनही पायाभूत सुविधांच्या अभावी पर्यटक आकर्षित होत नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला पूरक वातावरणनिर्मिती करण्यासाठी

- जमीर काझी,  मुंबईराज्याला तब्बल ७२० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभूनही पायाभूत सुविधांच्या अभावी पर्यटक आकर्षित होत नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला पूरक वातावरणनिर्मिती करण्यासाठी राज्य सागरमाला समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीमध्ये बंदरे विभागाच्या राज्यमंत्र्यांसह सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.बंदरांचे आधुनिकीकरण व जागतिक दर्जाच्या नवीन बंदरांची निर्मिती करण्याला यात प्रामुख्याने प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामागे व्यापाराबरोबरच पर्यटन व्यवसायाची वृद्धी व्हावी, हा प्रमुख उद्देश असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.राज्यातील किनाऱ्यावरील बंदरे गृह विभागाच्या अखत्यारीत आहेत. परंतु ‘२६/११’च्या घटनेनंतर त्या ठिकाणच्या पायाभूत सुविधांपेक्षा सुरक्षेबाबत अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक साधनसुविधांची कमतरता असल्याने अनेक निसर्गरम्य ठिकाणे असूनही पर्यटक येत नसल्याची बाब समोर आली होती. नव्याने स्थापन करण्यात अलेल्या समितीतर्फे किनारपट्टीचा अधिकाधिक वापर करून आर्थिक विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. माल वाहतुकीच्या दृष्टीने देशातील विविध बंदरे जोडण्याकरिता रस्ते व रेल्वे जोडणी प्रकल्पाचाही समावेश असणार आहे. सागरमाला समितीचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री रणजीत पाटील आहेत. त्याशिवाय बंदरे, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, महसूल व पर्यटन विभागाचे अपर सचिव / प्रधान सचिव / सचिव यापैकी एक जण त्याचप्रमाणे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य म्हणून असणार आहेत. समितीला या कार्यक्रमाबाबत विशेष मार्गदर्शन तत्त्वे बनविणे, सल्ला देणे, प्रकल्पाची निवड, त्याच्या अंमलबजावणीचा प्राधान्यक्रम निश्चित करणे, त्याचप्रमाणे संबंधित विभागांमध्ये धोरणात्मक समन्वय साधन्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. सागरमाला समितीकडून बंदर विषयक पायाभूत सुविधांबरोबरच बंदरांच्या प्रभावक्षेत्रांमध्ये इंडस्ट्रीयल लॉजिस्टीक्स पार्क, वेअरहाउसिंग, उत्पादन केंद्रे, मेरिटाइम झोन्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस, स्मार्ट सिटी आदींचा विकास केला जाईल. त्यासाठीचे प्रकल्प प्राधान्याने सार्वजनिक-खासगी सहभाग तत्त्वावर (बीओटी) व आवश्यक त्या ठिकाणी खासगी क्षेत्राच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.