शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अधिस्वीकृती समितीने घेतला नागपूरला माफसूचा आढावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2016 18:47 IST

भारतीय कृषी संशोधन समितीने (आयसीएआर)पाठवलेली अधिस्वीकृती समिती (दिल्ली )महाराष्ट्र राज्य पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा (माफसू)आढावा घेत असून, याकरिता

- राजरत्न सिरसाट
 
अकोला, दि. 08 -  भारतीय कृषी संशोधन समितीने (आयसीएआर)पाठवलेली अधिस्वीकृती समिती (दिल्ली )महाराष्ट्र
 राज्य पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा (माफसू)आढावा घेत असून, याकरिता ही समिती सोमवारी नागपुरातील माफसूच्या मुख्यालयात पोहोचली आहे. मंगळवारी ही समिती अकोल्यातील स्नातकोत्तर पशू, मत्स्य व विज्ञान संस्थेत पोहोचणार असल्याने येथील इमारतीच्या रंगरंगोटीच्या कामांना वेग आला आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती आयसीएआरने रद्द केल्याने माफसू खबरदारी घेत आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांचा आढावा मागील मे महिन्यात आयसीआरच्या अधिस्वीकृती समितीने घेतला होता. या आढाव्यात त्या समितीला शैक्षणिक, संशोधन व विद्यार्थ्यांना मिळणाºया सुविधा याबाबत असंख्य त्रुटी आढळल्याने मागील दोन महिन्यांपूर्वी आयसीआरने राज्यातील कृषी विद्यापीठाची अधिस्वीकृती रद्द केली आहे. परिणामी संशोधन, विस्तार व शिक्षणासाठी दिला जाणारा निधी आयसीआरने थांबवला आहे. आता याच धर्तीवर माफसूचा आढावा घेतला जात असल्याने माफसूच्या कुलगुरुंसह सर्वच जोमाने कामाला लागल्याचे येथील चित्र आहे. 
 केंद्रीय कृषी मंत्रालयांतर्गत कार्यरत भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सेवानिवृत्त उप -महाव्यवस्थापक डॉ. व्ही.के. तनेजा यांच्या अध्यक्षतेखाली चार तज्ज्ञांची समिती माफसूचा आढावा घेणार आहे. माफसूंतर्गत राज्यात मुंबई, पुण्यासह दहा पशू विज्ञान महाविद्यालये व संशोधन केंद्रे असून, अकोला येथे स्नातकोत्तर पशू, मत्स्य व विज्ञान संस्था आहे. हरियाणातील हिस्सारनंतर पशूवर संशोधन करणारी देशातील ही दुसºया क्रमांकाची संशोधन संस्था मानली जाते. राज्यातील इतर महाविद्यालयांच्या तपासणीनंतर ही अधिस्वीकृती समिती ९ आॅगस्टला सायंकाळी  अकोला येथे येणार आहे. रात्री मुक्काम करू न ९ आॅगस्ट रोजी आढावा घेतला जाईल. ११ ला पुणे, १२ ला मुंबई व १३ आॅगस्ट रोजी मुंबईत यासंदर्भात बैठक होईल.
आयसीआर या विद्यापीठाला विविध संशोधन तसेच शिक्षणासाठी निधी उपलब्ध करू न देते, या निधीचा विनियोग कसा होतो, विद्यार्थ्यांना सोयी, सवलती कशा दिल्या जातात, संशोधनाचा स्तर कसा, माफसूच्या या सर्व बाबींचा सूक्ष्म अभ्यास करू न ही समिती त्यांचा अहवाल आयसीएआरला सादर करणार आहे. पीएच.डी.च्या समस्या आहेत. माफसूच्याही ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. खासगी पशू महाविद्यालयाचा दर्जादेखील सुमार आहे.