शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बांधिलकी जपणारा माणूस!

By admin | Updated: May 27, 2017 06:19 IST

नितीन गडकरी हा एक वेगळा माणूस आहे. भाजपात ते अनेक वर्षांपासून आहेत. मंत्रिमंडळात काम करणाऱ्यावरच खरी जबाबदारी असते. त्याला अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतात.

- मनोहर जोशीनितीन गडकरी हा एक वेगळा माणूस आहे. भाजपात ते अनेक वर्षांपासून आहेत. मंत्रिमंडळात काम करणाऱ्यावरच खरी जबाबदारी असते. त्याला अनेक गोष्टी पार पाडाव्या लागतात. माझ्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी म्हणजे जबाबदारीने वागणारा, उत्साहाने वागणारा, काहीतरी घडवू पाहणारा असे व्यक्तिमत्त्व होते. खरे सांगायचे, तर हे मंत्रिपद म्हणजे तारेवरची कसरतच असते. फार थोडे मंत्री हे काहीतरी घडवायला उत्सुक असतात. त्यासाठीच ते या मार्गावर आलेले असतात. उरलेले बहुतांश तर या मंत्रिपदामुळे मिळणाऱ्या सोईसुविधा मिळाव्यात, ती सत्ता अनुभवता यावी, म्हणूनच झटत असतात. गडकरी मात्र, काहीतरी घडवू पाहणाऱ्या गटातील होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. गडकरी आणि मला जवळ आणणारा एक विषय म्हणजे मुंबई-पुणे रस्ता. अशा प्रकारचा रस्ता व्हावा, ही माझीही मुख्यमंत्री म्हणून इच्छा होती. आपल्या व्यवस्थेत अनेक विषयाचे अंतिम अधिकार हे मुख्यमंत्र्याकडे असतात. तसे तो विषय माझ्याकडेही होता. गडकरी त्या खात्याचे प्रमुख होते. सार्वजनिक बांधकाम खाते त्यांच्याकडे होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीत गडकरी यांच्याविरोधात माझ्याकडे एकही तक्रार आली नाही. एरव्ही अशा प्रकारचे खाते असेल, तर तक्रारींचा ओघच सुरू असतो, पण गडकरींबाबत असे घडले नाही. त्यांना अशा गोष्टीत रसच नव्हता. त्यांच्यात एक बांधिलकी होती. ते संघाचे आहेत. संघ बांधिलकी जपणाऱ्यांची संघटना आहे. ही बांधिलकी गडकरींमध्येही पाहायला मिळते. जेव्हा मुंबई-पुणे महामार्ग पूर्ण होत आला, तेव्हा मात्र, एका वेगळ्याच विषयाची चर्चा सुरू झाली. ती म्हणजे, हा महामार्ग नेमका कोणाचा? पत्रकारांनीही त्या वेळी या विषयाला महत्त्व दिले आणि त्याची चर्चा घडविली. त्या वेळी गडकरी यांनीच एका पत्रकाराला सांगितले की, ‘जर मुख्यमंत्री माझ्याबरोबर नसते, तर इतक्या झपाट्याने हा रस्ता झालाच नसता.’ हे गडकरी यांचे शब्द आहेत. सरकारमध्येही अनेक बंधन असतात. कसरत करावी लागते. मंत्री आणि मित्र अशा दोन्ही भूमिका आणि व्यक्तिमत्त्व मला गडकरी यांच्यामध्ये आढळले. मुंबई-पुणे रस्त्याच्या निमित्ताने पुढे अनेकांनी आमच्यात अंतर आणायचा अनेक लोकांनी प्रयत्न केला, पण गडकरी आणि माझ्यात त्यामुळे दुरावा निर्माण झाला नाही. तेव्हापेक्षा आता गडकरी यांचे स्थान मोठे आहे. त्यांचा परीघ वाढला आहे. पूर्वीपेक्षा ते आता अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. मीही केंद्रात मंत्री होतो. नितीन गडकरी यांनी त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी मला संधी द्यावी, अशी माझी इच्छा आहे.