शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आयुकाच्या शास्त्रज्ञांनी लावला दीर्घिकेचा शोध; ९.३ अब्ज प्रकाशवर्षे दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 03:06 IST

उच्चस्तरीय अतिनील किरणे नोंदविली

पुणे: भारताच्या पहिल्या बहू-तरंगलांबी अ‍ॅस्ट्रोसॅट उपग्रहाने ९.३ अब्ज प्रकाशवर्ष दूर असलेल्या एआय डीएफएसओ १ या दीर्घिकेतील उच्चस्तरीय अतिनील किरणे नोंदविली आहेत. कॉस्मिक कृष्णयुगानंतर जन्मास येणाऱ्या आयनीभवनावर आधारित विश्वाची निर्मिती करण्यामध्ये या अतिनील किरणांची महत्त्वाची भूमिका आहे.

द इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) येथील सहयोगी प्राध्यापक कनक साहा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हा शोध लावला आहे. त्यात भारत, स्वीत्झर्लंड, फ्रान्स, अमेरिका, जपान या देशातील वैज्ञानिकांचा समावेश आहे. नेचर अ‍ॅस्ट्रोनॉमी या नियतकालिकामध्ये २४ आॅगस्ट रोजी हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

संशोधन गटाने आॅक्टोबर २०१६ मध्ये हबल एस्कट्रीम डीपफिल्डमध्ये असलेल्या दीर्घिकेकडे इस्त्रोच्या अ‍ॅस्ट्रोसॅटच्या सहाय्याने दोन तासांमध्ये अधिक जास्त काळ निरीक्षणे नोंदवली. परंतु, त्यानंतर उत्सर्जन खरोखरच हे त्या दीर्घिकेकडून होत आहे हे निश्चित करण्यासाठी उपलब्ध डेटाचे विश्लेषण करण्यासाठी दोन वर्षे लागली. अतिनील किरणे पृथ्वीच्या वातावरणाद्वारे शोषली जात असल्याने त्यांचा अभ्यास अवकाशातून केला जातो. यापूर्वी अ‍ॅस्ट्रोसॅटच्या यूव्हीआयटीपेक्षा मोठी असलेल्या नासाच्या हबल अवकाश दुर्बिणीला सुद्धा या दीर्घिकेमधून उत्सर्जित असे अतिनील उत्सर्जन टिपता आले नाही.

आयुकाचे संचालक डॉ. शोमक रायचौधरी म्हणाले की, विश्वाचे अंधकारमय युग संपून प्रकाशाचे आगमन कसे झाले, याबद्दल हे संशोधन एक महत्त्वाचे पुरावे देते. प्रकाशाच्या सर्वात पहिल्या स्रोतांचा शोध लावणे कठिण काम आहे.आयनीभवन म्हणजे काय?महास्फोटानंतर (बिग बँग) विश्व हे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स व इलेक्ट्रॉन्स यांच्या प्रवाही मिश्रणासमान होते. ते थंड होऊ लागले तसे प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स व इलेक्ट्रॉन्स यांचे एकत्रिकरण होऊन हायड्रोजनच्या आयनीभवन झालेल्या अणूंमध्ये रूपांतरीत होऊ लागले. आयनीभवन झालेल्या हायड्रोजन आणि हिलियम अणूंकडे इलेक्ट्रॉन आकर्षिले जातात आणि ते निष्क्रिय अणूंमध्ये परिवर्तित होतात. यामुळे सर्वात पहिल्यांदा प्रकाशाचे सर्वच विखुरणे शक्य झाले. विश्वाच्या त्या कालखंडात तारे आणि दीर्घिका नव्हत्या. ते संपूर्णरित्या अंधारलेले होते. यानंतर कदाचित काही दशलक्ष वर्षांनी सर्वप्रथम तारे व दीर्घिकांची निर्मिती झाली आणि अंधारयुगाचा अंत झाला.