शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दंड माफ करण्यासाठी आयुक्त करणार न्यायालयास विनंती

By admin | Updated: September 19, 2016 22:14 IST

परिवहनच्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने काढलेल्या वारंटबाबत विधानसल्लागाराने मला माहितीच दिलेली नाही

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. १९ : परिवहनच्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने काढलेल्या वारंटबाबत विधानसल्लागाराने मला माहितीच दिलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने मला ठोठावलेला दंड माफ करावा अशी विनंती मी उच्च न्यायालयात हजर राहून करणार आहे अशी माहिती आयुक्त विजयकुमार काळम यांनी सोमवारी दिली.

परिवहनच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने बजाविलेले कोणतेही पत्र मला मिळालेले नाही. न्यायालयाने मला दुसऱ्यांदा दंड ठोठाविला हे वर्तमानपत्रात वाचल्यावर कळाले. याबाबत मी विधानसल्लागार अरुण सोनटक्के यांना विचारणा केल्यावर प्रकरण परिवहनचे असल्याने परिवहन व्यवस्थापकांकडे माहिती पाठविली असे उत्तर दिले आहे. उच्च न्यायालयाने पहिल्यांदा दहा हजार दंड ठोठाविला ही बाब माझ्यापासून लपवून ठेवण्यात आली. दुसऱ्यांदा न्यायालयाकडून समन्स आले. त्याची माहिती देण्यासाठी आल्यावर मी कामात व्यस्त होतो असा खुलासा सोनटक्के यांनी केला आहे. पण ही बाब गंभीर आहे. न्यायालयाकडून कोणतीही तारीख किंवा साक्षीचे समन्स आल्यावर मला माहिती देणे गरजेचे आहे. मी उपलब्ध झाले नाहीतरी टपालातून असे पत्र माझ्याकडे पाठविणे बंधनकारक आहे. असे असताना विधान सल्लागार कार्यालयाकडून कोणताच संवाद साधण्यात आलेला नाही.

संबंधित प्रकरण परिवहनसंबंधी असले तरी त्यात दुसऱ्या क्रमांकाने मला पार्टी करण्यात आले आहे. या प्रकरणावर काय निर्णय घ्यायचा हा परिवहन व्यवस्थापकाचा प्रश्न असला तरी मी पार्टी असल्याने माहिती देणे बंधनकारक होते. घडल्या प्रकाराबद्दल विधानसल्लागाराकडून खुलासा मागवून काय कारवाई करायची हे नंतर ठविले जाईल. पण तुर्तास मी न्यायालयास दंड माफ करण्याबाबत विनंती करणार आहे. प्रशासनाने मला अंधारात ठेवल्याने मी यात दोषी नाही हे पटवून देणार आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने ठोठाविलेल्या दंडाच्या रकमेची तजवीज करण्यासाठी विधानसल्लागार सोनटक्के हे आज मुंबईला रवाना झाले होते. लिपिक शेंडगे निलंबितआयुक्तांना उच्च न्यायालयाने दंड ठोठाविल्याचे कळताच प्रकरण शेकणार म्हणून विधानसल्लागार कार्यालयाने वरिष्ठ लिपिक सुनील शेंडगे यांचा कारभार कसा गहाळ आहे याबाबत आयुक्तांकडे अहवाल सादर केला. त्यावर आयुक्त काळम यांनी सोमवारी शेंडगे यांना न्यायालयाच्या १0 कामकाजात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून निलंबित केले.