शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरसाठी पोलीस आयुक्तालय

By admin | Updated: June 15, 2017 02:04 IST

मीरा-भार्इंदर शहरासाठी लवकरात लवकर पोलीस आयुक्तालय आणि विशेष बाब म्हणून स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मीरा-भार्इंदर शहरासाठी लवकरात लवकर पोलीस आयुक्तालय आणि विशेष बाब म्हणून स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. मीरा-भार्इंदर शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांसदर्भात सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. महानगरपालिकेने पोलीस आयुक्तालयास जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असल्याने यासंदर्भात पुढील कार्यवाही तत्काळ करण्यात यावी. स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापनेसाठी प्रस्ताव द्यावा त्यास विशेष बाब म्हणून तत्काळ मान्यता देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या वेळी स्थानिक आमदार नरेंद्र मेहता, महापौर गीता जैन यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दहिसर ते मीरा-भार्इंदर मेट्रो मार्ग, शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न, शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सूर्या धरणाच्या पाणी योजनेचे उद्घाटन आदी प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली. दहिसर ते मीरा-भार्इंदर मेट्रो मार्गाचा प्रस्ताव ३० जूनपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीसमोर आणण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. जुन्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी अशा इमारती तीस वर्षांपूर्वीच्या असण्याची अट आहे. जुन्या इमारतींसाठीचे हे धोरण २५ वर्षांचे करता येईल का, याबाबत तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले. शिवाय, इमारती लवकर कशा धोकादायक होतात याचा तपास करून अशा बांधकाम व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यासाठी महापालिकेने एमएमआरडीएकडे प्रस्ताव दिल्यास पालिकेच्या आर्थिक क्षमतेनुसार कर्ज देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सूर्या धरणातून २९९ एम.एल.डी. पाणी योजनेच्या भूमिपूजनाची तारीख लवकरच घोषित करण्यात येईल. पाण्याची आवश्यकता असणाऱ्या महापालिकांनी त्यांच्याकडील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते पाणी एमआयडीसीला दिल्यास एमआयडीसीसाठीचे राखीव पाणी अशा महापालिकांना उपलब्ध करून देता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सांगितले. शहरासाठी मंजूर ७५ एम.एल.डी. योजना पूर्ण झाली असल्याने ते पाणी देण्याबाबत कार्यवाही त्वरित पूर्ण करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिल्या.‘एनए’साठी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडणारमीरा-भार्इंदरमध्ये प्रलंबित अकृषक (एनए) परवानगी देण्याबाबतचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २७ जून रोजी याबाबतची सुनावणी असून, स्थगिती उठविण्यासाठी सरकार प्रभावीपणे बाजू मांडेल. या सुनावणीत स्थगिती न उठल्यास जमीन मालकाचे शपथपत्र घेऊन मनपाने परवानगी देण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.