शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाई ‘पर्यटन’ दौऱ्यावर आयुक्त नाराज

By admin | Updated: June 11, 2016 02:00 IST

आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने विरोधकांनी नालेसफाईचे बिंग फोडून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे ठरविले

मुंबई : आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने विरोधकांनी नालेसफाईचे बिंग फोडून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचे ठरविले आहे़ तर आपल्या बचावासाठी सत्ताधारी शिवसेना व भाजपा नेत्यांमध्येही नाल्यांच्या पाहणीची चढाओढ सुरू आहे़ मात्र राजकीय नेत्यांच्या नालेसफाईच्या या सहलींनी आयुक्त चांगलेच भडकले आहेत़ त्यामुळे उठसूट कोणाच्याही दौऱ्याला हजेरी लावू नका, अशी ताकीदच त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिली आहे़३१ मे रोजी नालेसफाईच्या कामाची डेडलाइन संपली़ तरीही अनेक भागांमध्ये नाल्यांमध्ये अद्याप गाळ पडून आहे़ यामुळे मुंबई तुंबणार, अशी भीती विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांनीही व्यक्त केली आहे़ त्यानंतरही या नालेसफाईच्या कामाच्या पाहणीचे दौऱ्यांवर दौरे सुरू आहेत़ विविध समित्यांचे अध्यक्ष, नेते, गटनेते नालेसफाईच्या दौऱ्यावर निघत असल्याने अधिकाऱ्यांनाही त्यांच्या मागून धावावे लागते़ मात्र यामध्ये बराच वेळ वाया जात असल्याने मान्सूनपूर्व कामांच्या तयारीवर याचा परिणाम होत आहे़ गेल्या काही दिवसांमध्ये या दौऱ्यांनी रेकॉर्ड केला आहे़ त्यामुळे अशा दौऱ्यांना हजर राहण्यापूर्वी परवानगी घेण्याची सक्ती आयुक्त अजय मेहता यांनी केली आहे़ पूर्वपरवानगीशिवाय दौऱ्याला जाणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईचे संकेत दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे़ (प्रतिनिधी)