शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

विकासनिधीला आयुक्तांची कात्री

By admin | Updated: May 13, 2017 01:35 IST

महापालिका अर्थसंकल्पात ११ हजार ९११ कोटींची कपात केल्यानंतर आयुक्त अजय मेहता यांनी विकासनिधीलाही कात्री लावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिका अर्थसंकल्पात ११ हजार ९११ कोटींची कपात केल्यानंतर आयुक्त अजय मेहता यांनी विकासनिधीलाही कात्री लावली आहे. स्थायी समिती सदस्यांनी सुचवलेल्या विकास कामांसाठी राखीव निधीत गतवर्षीच्या तुलनेत थेट दीडशे कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांना ३५० कोटींच्या निधीवरच समाधान मानावे लागले आहे. अर्थसंकल्पात विकासाचे फुगे फुगविण्यात आले, तरी त्यावर जेमतेम २५ ते ३० टक्केच अंमल होत आहे. यामुळे आवश्यक तेवढ्याच प्रकल्पांसाठी तरतूद करीत, अर्थसंकल्पात सुमारे १२ हजार कोटींची कपात करण्यात आली. आयुक्तांच्या या पारदर्शक अर्थसंकल्पात नगरसेवकांनी सुचवलेल्या विकासकामांनाही हातचे राखूनच निधी वाटण्यात आला आहे. सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षातील २५ हजार १४१ कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी देताना विकास निधीतील कपातीचा निर्णयही सदस्यांनी निमूट स्वीकारला.सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात ३७ हजार कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. यामध्ये यंदा कपात झाली. त्याप्रमाणे, गतवर्षी मंजूर झालेला ५०० कोटी रुपये विकास निधीही या वेळेस ३५० कोटी रुपयांवर आणण्यात आला आहे. यामध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या वचननाम्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भाजपाच्या पारदर्शक कारभारावरच पावले टाकत चाललेल्या या अर्थसंकल्पावर सत्ताधारी व विरोधकांनी हरकत घेतली नाही. यासाठी केली काटकसर...अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचा योग्य वापर होत नाही. निधी शिल्लक राहतो. त्यामुळे काटकसर हे तत्त्व समोर ठेवून विकास निधीची तरतूद केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कामे चोख करण्याची जबाबदारी सोपविली आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा अर्थसंकल्पातील विकासकामे आणि विकास आराखडा या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर मांडल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. जेवढे काम तेवढा निधी हेच धोरण ठेवले असून, कोणत्याही विकास कामासाठी निधी लागल्यास तो दिला जाईल, अशी भूमिका आयुक्तांनी घेतला आहे. संख्याबळ अधिक असल्याने शिवसेनेला विकास निधीतील मोठा वाटा आतापर्यंत मिळत होता. त्यामुळे शिवसेना त्या वेळीचा मित्र भाजपाच्या हातावर तुरी देत मोठा वाटा आपल्याकडे खेचून आणत असे. मात्र, युती तुटल्यानंतर स्वबळावर निवडणूक लढवून भाजपाने ८२ जागांवर विजय मिळवला. ही ताकद वाढल्यामुळे भाजपाचा महापालिकेतील आवाजही वाढला आहे. विकास निधीमध्ये समान वाटा मिळण्याची मागणी भाजपातून पुढे आली आहे. परिणामी, विकास निधीवरून शिवसेना-भाजपात वाद होण्याची शक्यता आहे.