शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी साधला नागरिकांशी संवाद

By admin | Updated: August 1, 2016 02:46 IST

महानगरपालिकेच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीबीडी सेक्टर तीन येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात शनिवारी झालेल्या वॉक विथ कमिशनर उपक्रमांतर्गत नागरिकांनी पार्किंग, अतिक्रमण, ओला-सुका कचरा वर्गीकरण, फेरीवाल्यांचा पदपथ रस्त्यांवरील उपद्रव, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा विविध बाबींबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारी, सूचना मांडल्या.नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रस्त्यावरील कचराकुंड्यांची संख्या कमीकमी करून शून्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी वर्गीकृत कचरा दिल्यास त्याच्या वर्गीकरणावर होणाऱ्या खर्चात बचत होईल आाणि नागरिकांच्या करातून मिळणारा बचत झालेला निधी इतर महत्त्वाच्या नागरी कामांकरिता वापरता येईल अशी प्रतिक्रिया मुंढे यांनी व्यक्त केली. ज्या सोसायट्या कचरा वर्गीकरण करीत नसतील त्यांच्यामुळे आपल्याला व समाजाला होणारा त्रास लक्षात घेऊन कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्यांनी त्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. १३५ लिटर प्रतिदिन प्रतिमाणसी या जागतिक निकषानुसार आपण सोसायट्यांना पाणीपुरवठा करीत असल्याचे मुंढे यांनी सांगितले. पाण्याचे वितरण सोसायट्यांनी त्यांच्या सदस्यांना योग्य प्रमाणात करावे अशा सूचनाही येथे उपस्थित सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या. शहर शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असून महानगरपालिकेच्या शाळांतील गुणवत्ताही इतर शहरांतील शाळांच्या तुलनेत चांगली असल्याचे सांगत यापुढेही शिक्षण व आरोग्य सुविधांच्या गुणवत्ता वाढीवर भर देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही विकास प्रक्रि येत आपण पुढच्या पिढीचा विचार करूनच पावले उचलायला हवीत असे सांगत आयुक्त मुंढे यांनी नागरिकांनी जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)क्रीडांगणाच्या वेळापत्रकाचे फलक लागणारशहरातील क्रीडा संकुलांबाहेर मोकळा वेळ दर्शविणारे वेळापत्रकाचे फलक लावले जाणार असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. कोणत्या मैदानात कोणते खेळ खेळले जातील याचेही सूचनाफलक लावले जाणार असून शहरातील क्रीडापटूंना याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. शहरातील मैदाने सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिले जाणार नाहीत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.