शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

शिक्षणाचे व्यापारीकरण, भगवीकरण करण्याचे केंद्राचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 21:19 IST

केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने शिक्षण धोरणासंबधी दोन अहवाल प्रसिद्ध केले. परंतू या अहवालातून शिक्षणाच्या व्यापारीकरणाचे व भगवीकरणाचे उदात्तीकरण करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
अकोला,दि.16 - केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने शिक्षण धोरणासंबधी दोन अहवाल प्रसिद्ध केले. परंतू या अहवालातून शिक्षणाच्या व्यापारीकरणाचे व भगवीकरणाचे उदात्तीकरण करण्यात आले. त्यात गुरूकुल पद्धत, वैदीक शिक्षणाचा उल्लेख आहे. मात्र, शाहू, फुले, आंबेडकरांसह स्वातंत्र्य चळवळीतील थोरपुरूषांचे योगदान वगळण्यात आले. स्वतंत्र विचारशक्ती असलेले विद्यार्थी शिक्षणातून घडविण्याऐवजी जागतिक भांडवलशाहीसाठी कुशल मजूर व व्यवस्थेचे भाट निर्माण करणे हे केंद्र शासनाच्या नव्या शिक्षण धोरणाचे व्हिजन आहे. असा आरोप माजी शिक्षक आमदार व अ.भा. समाजवादी अध्यापक सभेचे अध्यक्ष जे.यु. नाना ठाकरे यांनी केला. 
 
समाजवादी अध्यापक सभेच्या वतीने १५ जानेवारीपासून शिक्षणहक्क जनजागरण यात्रेस प्रारंभ झाला. ही यात्रा सोमवारी दुपारी अकोल्यात पोहोचली. महात्मा फुले नर्सिंग महाविद्यालयात यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  देशातील शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडून आला पाहिजे. त्यासाठी समाजात जागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजवादी अध्यापक सभेने विदर्भात यात्रा काढली आहे. शासनाचे धोरण हे विनाअनुदानित शिक्षणाचे धोरण आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून, चार्तुवर्ण्य व्यवस्था निर्माण झाली आहे. शाहु, फुले, आंबेडकरांनी गोरगरीबांना शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. परंतू शासनाची त्या उलट भुमिका आहे. त्याचा आम्ही विरोध केला पाहिजे. सर्वांना मोफत आणि गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. अशी भुमिका माजी आमदार ठाकरे यांनी मांडली.