शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखवर केवळ प्रसिद्धीसाठी टीका- हेमामालिनींचा भाजपाला घरचा आहेर

By admin | Updated: November 6, 2015 13:53 IST

फक्त प्रसिद्धीसाठी काही नेते शाहरूखला लक्ष्य करून त्याच्यावर टीका करत आहेत, अशा शब्दांत भाजपा खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भाजपाला घरचा आहेर दिला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - फक्त प्रसिद्धीसाठी काही नेते शाहरूखला लक्ष्य करून त्याच्यावर टीका करत आहेत, शाहरुख हा देशाचा अभिमान असून त्याच्यावर अशी टीका करणं चुकीचं आहे अशा शब्दांत शाहरूखची पाठराखण करत भाजपा खासदार व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी भाजपा नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. शाहरूखला मत मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केलं.
देशात धार्मिक असहिष्णूता वाढत आहे, असे मत बॉलिवूडचा बादशाह शाहरूखने  व्यक्त केले होत. शाहरूखच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान शाहरूखने असहिष्णुतेमुळे आपली अंधःकाराकडे वाटचाल होण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र त्याच्या या वक्तव्यानंतर वाद उफाळला आणि भाजपा नेत्यांनी  त्याच्यावर टीकास्त्र सोडलं. शाहरूख हा देशद्रोही असून तो भारतात राहत असला तरी त्याचे मन मात्र पाकिस्तनातच आहे, अशी टीका भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केले होते. तर शाहरुख पाकिस्तानचा एजंट असल्याचा आरोप करत त्याला पाकिस्तानलाचे पाठवणं योग्य ठरेल असे टीकास्त्र साध्वी प्राची यांनी सोडले. भाजपाचे आणखी एक नेते खासदार योगी आदित्यनाथ यांनी शाहरूखची तुलना पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईद याच्याशी केली. 
या सर्व वादानंतर आणखी तेल ओतत दहशतवादी आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदने शाहरूखला पाकिस्तानमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. शाहरुख खान याच्याप्रमाणे भारतात मुस्लिम नागरिकांना केवळ आपल्या धर्मामुळे अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी भारत सोडून पाकिस्तानमध्ये यावे, असे सईदने म्हटले. भाजपा नेत्यांनी शाहरुखवर केलेल्या टीकेची दखल घेत हाफिजने टिष्ट्वटरवरून हे निमंत्रण दिले. ‘कला, क्रीडा व संस्कृती क्षेत्रात जगभरात आपले नाव कमावणाऱ्या भारतीय मुस्लिमांना आपली ओळख टिकविण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत आहे. या भारतीय मुस्लिमांमध्ये शाहरुख खानही आहे. त्याला आपल्या धर्मामुळे भेदभाव सहन करावा लागत असेल, तर त्याने पाकमध्ये यावे, असे त्याने म्हटले.