शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

महिलाविरोधी वक्तव्य केल्याची श्रीहरी अणेंवर टीका

By admin | Updated: May 7, 2016 20:49 IST

शासनाने आंदोलनाला हिंसक वळण दिले तर आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाही, हे अ‍ॅड. अणे यांचे वक्तव्य महिलाविरोधी असल्याची टीका स्त्री अत्याचार विरोधी परिषदेने केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
 
अणे यांना महिलांचा अपमान करण्याचा हक्क नाही
 
नागपूर, दि. 08 - वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्यावर एका वक्तव्यामुळे टीका करण्यात येत आहे. शासनाने आंदोलनाला हिंसक वळण दिले तर आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाही, हे अ‍ॅड. अणे यांचे वक्तव्य महिलाविरोधी आहे. यातून त्यांनी महिलांचा अपमानच केला असून, असे करण्याचा त्यांना हक्क नसल्याचे टीकास्त्र स्त्री अत्याचार विरोधी परिषदेने सोडले आहे.
 
६ मे रोजी नवी दिल्लीत अ‍ॅड. अणे यांनी ‘नॅशनल फेडरेशन फॉर न्यू स्टेटस्’च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी संबंधित वक्तव्य केले होते. बांगड्या हे महिलांच्या कमकुवतपणाचे लक्षण समजूनच अणे असे म्हणाले आहेत. परंतु हा आमचा अपमान असून आम्ही त्यांचा निषेध करतो, असे मत स्त्री अत्याचार विरोधी परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सीमा साखरे यांनी व्यक्त केले. एके काळी अ‍ॅड. अणे यांनी भाषणातून महिलांचा अपमान करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात जनहित याचिका लढविली होती. परंतु राजकीय परिघात प्रवेश झाल्याबरोबर त्यांची मानसिकता बदलली आहे. कोणत्याही पुरुषाने महिलेला कमकुवत समजून तिच्या बांगड्यांवर टीका करणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. अणे यांनी विदर्भाच्या आंदोलनाची शक्ती दाखविण्यासाठी महिलांच्या बांगड्यांचा उपयोग केला याची खंत वाटते, असेदेखील डॉ. साखरे म्हणाल्या.