शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

विनोदी कादंबरी, नाटक लिहायचा विचार घोळतोय

By admin | Updated: April 14, 2015 01:45 IST

विनोदी नाटक, विनोदी कादंबरी लिहिण्याचा विचार डोक्यात घोळतोय तसाच आत्मचरित्राचाही... सांगत होते ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार!

पुणे : आता संगळे संपले असले तरी मन सांगतेय... तुझ्या डोक्यात जे आहे ते लिहून काढ... विनोदी नाटक, विनोदी कादंबरी लिहिण्याचा विचार डोक्यात घोळतोय तसाच आत्मचरित्राचाही... सांगत होते ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार!मिरासदार मंगळवारी (दि. १४) ८९व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, ग्रामीण जीवनातील हास्य-विनोद शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या द. मा. यांनी विनोदी नाटक आणि विनोदी कादंबरी लिहिण्याचा मानस ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केला. वयाच्या या टप्प्यावरही मिरासदार यांचा नित्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू आहे. जसे की, सकाळी थोडा वेळ फिरायला जाणे, वृत्तपत्राचे वाचन करणे, दूरचित्रवाहिनीवरील बातम्या बघणे, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे, शक्य असेल तेवढा प्रवास करणे.ते म्हणाले, ‘‘डोक्यात आजही अनेक विषय घोळत आहेत. लिखाणासाठी मनही स्फूर्ती देत आहे. असे असले तरी परिस्थिती अनुकूल नाही. विनोदी लेखन केले पण विनोदी नाटक अथवा विनोदी कादंबरी अद्याप लिहिली गेली नाही. या पैकी एखादे जरी जमले तरी स्वत:ला भाग्यशाली समजेन. विनोदी नाटक अथवा कादंबरीसाठी डोक्यात अजून पक्का आराखडा तयार नाही. मुद्दे अर्धवट आहेत. विषयांची भट्टी पूर्ण जमलेली नाही. कादंबरी, नाटक लिखाणासाठी लेखनिक घ्यावा, असे सुचविले जाते; पण काय लिहायचे हे अद्याप डोक्यात नसल्याने काही करता येत नाही. विचरांची मालिका पूर्ण झाली की ते कागदावर उतरण्यास वेळ लागणार नाही.’’अकलूज येथे वास्तव्य होते तोपर्यंतच्या आठवणी लिहिलेल्या आहेत. नंतर शिक्षणासाठी पंढरपूरला आलो तेथून पुढच्या आठवणी अद्याप लिहिलेल्या नसल्याचे ते म्हणाले.(प्रतिनिधी)४१९६१ साली द. मा. मिरासदार यांनी व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील यांच्यासह नागपुरातील धनवटे सभागृहात कथावाचनाला सुरुवात केली. ही आठवण त्यांच्या मनात अजूनही ताजी आहे. हा संदर्भ देऊन ते म्हणातात, कथावाचन असा प्रकार सध्या फारसा दिसत नाही. कथाकथन तर कुणी करताना दिसत नाही. कथावाचन, कथाकथनात एक वेगळीच मौज आहे. पुढच्या लेखकांनी ही परंपरा सुरू ठेवावी.