शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

येऊ दे वादळ कितीही, जागचा हलणार नाही!

By admin | Updated: June 17, 2014 00:59 IST

आई-वडील, दोन मुले असा सुंदर चौकोनी संसाऱ भौगोलिक सुख ज्याला म्हणतात त्याचा तर पाऊसच पडायचा घरात़ देवाने असे भरभरून दिलेले असताना त्याचे आभार नको का मानायला, असा विचार खुरसनकर दाम्पत्याच्या

करण, रोहितची जिद्द : केदारनाथ जलप्रलयात गमावले आई-वडीलयोगेश पांडे - नागपूरआई-वडील, दोन मुले असा सुंदर चौकोनी संसाऱ भौगोलिक सुख ज्याला म्हणतात त्याचा तर पाऊसच पडायचा घरात़ देवाने असे भरभरून दिलेले असताना त्याचे आभार नको का मानायला, असा विचार खुरसनकर दाम्पत्याच्या मनात आला आणि त्यांनी थेट केदारनाथ गाठले़ पण, काळ जणू पाठलागच करीत होता त्यांचा़ घाटमाथ्यावरून भाविकांचा घास घ्यायला निघालेल्या पावसाच्या विक्राळ लाटांनी खुरसनकर दाम्पत्यालाही आपले शिकार बनविले अन् ज्या मुलांच्या सुखी भविष्याच्या कामनेसाठी ते केदारनाथला गेले होते ती मुले एका क्षणात अनाथ झाली़ आज त्या दुर्दैवी घटनेला एक वर्ष पूर्ण झाले़ आज खुरसनकर दाम्पत्य या जगात नाही़ पण, त्यांच्या दोन्ही मुलांनी हिंमत हरलेली नाही़ एकमेकांना आधार देत ते आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वादळाचा समर्थपणे सामना करीत आहेत़ त्यांच्याच जिद्दीची ही कहाणी आहे़अगदी मागील वर्षीपर्यंत विजेचे बिल कसे भरतात हेदेखील करणला माहीत नव्हते. परंतु आज तो एकाच वेळी निरनिराळ््या जबाबदाऱ्या पेलतो आहे. वेदनांनी भरलेल्या आठवणींना मनात ठेवून गेल्या वर्षभरापासून तो झटतोय. संघर्ष करतोय लहान भावाला म्हणजे रोहितला त्याच्या पायावर उभे करण्यासाठी, जलप्रलयाच्या तडाख्याने क्षणात दूर गेलेल्या आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी. मागील वर्षी १६ जून रोजी हनुमाननगर येथील विमा व्यावसायिक विनोद खुरसनकर आपल्या पत्नी आरती यांच्यासोबत केदारनाथ यात्रेला गेले होते. परंतु अचानक नियतीने अक्षरश: सूड उगविल्याप्रमाणे रौद्ररूप धारण केले अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले. त्यानंतर त्यांच्याशी काहीच संपर्क झाला नाही. इकडे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा त्यांचा मोठा मुलगा करण व दहावीला असणारा लहान मुलगा रोहित यांच्या तर पायाखालची जमीनच निसटून गेली होती. चौकोनी कुटुंबातील आधारस्तंभच निखळून गेल्याने या दोघा भावंडांचे काय होणार असा प्रश्न खुरसनकर कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांना पडला होता.परंतु म्हणतात ना, परिस्थिती मनुष्याला सर्व काही शिकवते व संकटांशी लढण्याचे बळ देते. सुरुवातीचे काही दिवस हा मोठा धक्का पचवू न शकलेल्या करणने मनाशी संकल्प केला अन् सर्व जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही प्रकारचा अ़नुभव नसतानादेखील त्याने सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पाडले. शिवाय वडिलांच्या व्यवसायात लक्ष घातले. इतके करीत असताना त्याने स्वत:च्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. रायसोनी महाविद्यालयात तो आज तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. जवळच राहणारे त्याच्या आजोळचे सदस्य त्यांची बरीच काळजी घेतात. आजही चमत्काराची आशालहानपणापासून घरातील सर्व कामे आई-बाबाच करायचे. आम्हाला चांगल्या तऱ्हेने अभ्यास करता यावा यासाठी दोघेही झटायचे. आईचा आग्रह असायचा की बाहेरची कामेदेखील आम्हाला यायला हवी. आज परिस्थितीमुळे मला सर्व कामे करावी लागत आहेत. आज आई असती तर तिला नक्कीच समाधान मिळाले असते. आज ते आमच्यात नाहीत, पण त्यांचे संस्कार आमच्यासोबत आहेत. हीच आमच्या आयुष्यासाठी शिदोरी ठरेल, अशा भावना करणने व्यक्त केल्या. मागील वर्षी १६ तारखेला नेमके काय झाले हे माहीत नाही. परंतु मनात आजही चमत्काराची आशा जिवंत आहे. माझा भाऊ माझी प्रेरणा आहे व तो माझी खरी शक्ती आहे, असे सांगत असताना रोहितच्या भावना दाटून आल्या होत्या.