शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

मंडपात अवतरली प्रेयसी!

By admin | Updated: May 6, 2016 02:53 IST

लग्नमंडपात येऊन नवरदेव हा आपला प्रियकर असल्याचा दावा प्रेयसीने केल्यामुळे लग्न मोडलेच. शिवाय, नवरदेवाला नवरीच्या वऱ्हाडींनी चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे

साक्री (जि. धुळे) : लग्नमंडपात येऊन नवरदेव हा आपला प्रियकर असल्याचा दावा प्रेयसीने केल्यामुळे लग्न मोडलेच. शिवाय, नवरदेवाला नवरीच्या वऱ्हाडींनी चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे वैवाहिक जीवनाचे स्वप्न पाहणाऱ्या नवऱ्या मुलाचे पहिले पाऊल बुधवारी साक्री पोलीस स्टेशनमध्ये पडले. लग्न मोडल्यानंतर यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. साक्री येथील मुलाचे लग्न वसमार येथील मुलीशी ठरले होते. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर बुधवारी विवाहाची तारीख निश्चित झाली होती. लग्न म्हसदी येथील देवीच्या मंदिरात लागणार होते. नवरदेव व नवरीकडचे सर्व नातेवाईक लग्न समारंभाच्या ठिकाणी उपस्थित होते. तेवढ्यात नवरदेवाची मुंबई येथील प्रेयसी मंडपात हजर झाली. नवरदेवाशी माझे संबंध असल्याचे सांगितल्यावर, उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. ही माहिती त्या मुलीने देताच, नवरीकडच्या मंडळींनी नवरदेव मुलाला चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली, परंतु समाज बांधवांनी मध्यस्ती करून हे प्रकरण शांत केले. त्यानंतर, विवाह रद्द करण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)