शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
3
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
4
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
5
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो समोर आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
6
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
7
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
8
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
9
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
10
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
11
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
12
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
13
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
14
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
15
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
16
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
17
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
18
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
19
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
20
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

दुष्काळाविरुद्ध एकत्र लढा

By admin | Updated: September 7, 2015 01:38 IST

शरद पवार असतील.. नारायण राणे असतील.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.. की कोणीही.. आता दुष्काळावर राजकारण नको.. तुमच्यात वितंडवाद नको..

दत्ता थोरे, लातूरशरद पवार असतील.. नारायण राणे असतील.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.. की कोणीही.. आता दुष्काळावर राजकारण नको.. तुमच्यात वितंडवाद नको.. सगळे विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्ष आणि आपण एकत्र येऊन या परिस्थितीशी झगडूयात. आता एकमेकांची उणीदुणी नको, असे आवाहन सिनेअभिनेता नाना पाटेकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे.नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘आपण सारे’च्या वतीने लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्णातील ११३ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजारांची मदत करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. गेल्या ११५ वर्षांतला हा सगळ्यात मोठा दुष्काळ आहे. कुणीतरी चुकत असेल त्याच्यावर बोट ठेवायला आपल्याला नंतर वेळ आहे. दौरा करायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन करावा. तुम्ही एक आहात म्हटल्यावर आम्ही समवेत येऊ, असे नाना पाटेकर म्हणाले.नाना पाटेकरांचा धीरगंभीर आवाज आणि मकरंद अनासपुरेंचे विनोद सोडून शेतकऱ्यांच्या सतावणाऱ्या चिंतेचे व्यवस्था व समाजाला विचारलेले प्रश्न यामुळे वातावरण भावूक झालेले. या कुटुंबियांना मंचावरही न बोलावता थेट त्यांच्या खुर्चीपर्यंत जाऊन नाना पाटेकरांनी धनादेश दिला आणि सोबतीला दिला जगण्याचा दुर्दम्य आशावाद व आत्महत्या न करण्याचा सल्ला.कुराणातील आत्महत्या करणेगुन्हा ही गोष्ट आवडते मला कुराणातील आत्महत्या करणे हा गुन्हा आहे; देवाशी प्रतारणा आहे, हे वचन मला खूप आवडते. त्यामुळे मुसलमान माणूस आत्महत्या करीत नाही. क्वचितच तुरळक झाल्या असतील. देव म्हणजे कोण? आपल्यातील ही माणसेच. त्यांना सोडून कसं जाता येईल ? आम्ही फक्त पोष्टमन...मी आणि मकरंद जरी पुढे असलो तरी हे पैसे आमचे नाहीत. लोकांमध्ये संवेदना आहेत. अनेक लोकांनी आम्हाला चेक्स दिले. पैसे दिले. आम्ही फक्त पोष्टमन आहोत. तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत. बाब पैशांची नाही तर आपल्याला आत ते जाणवतंय की नाही याची आहे, असे नाना म्हणाले.वेफर्सच्या पुड्यावरती किंमत असते. गुटखा-औषधांवर असते. फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या मालावर किंमत छापलेली नसते. मी अडाणी माणूस आहे. शेतकरी आहे. एखादं पीक मेलं तर काय होतं याची मला जाणीव आहे. तुम्ही जे पिकवता त्याला हमी भाव ठरविता आला पाहीजे. कशाला काय भाव आहे हे आधीच माहीत झालं तर, मला हमीभाव पाहिजे की नाही. दुधाचा भाव १७ रुपयांनी घ्यायचा आणि बाजारात ७० रूपयाने विकायचा, हे का? असा सवाल नाना पाटेकर यांनी केला.