शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणमुक्तीसाठी एकत्र या!

By admin | Updated: August 4, 2016 02:36 IST

जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करून कुपोषणाला हद्दपार करू या, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी केले.

पालघर : जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काम करून कुपोषणाला हद्दपार करू या, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले यांनी केले.भारत सरकार आणि इंडियन अ‍ॅकॅडॅमी आॅफ पेडिया ट्रिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डीएसएम इंडियाच्या सीएसआर फंडातून जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना टॅब तसेच प्रत्येक अंगणवाडी सेविकांना मायक्र ो-एसडी कार्डाचे वितरण पालघर येथे शुक्रवारी संपन्न झाले, त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास सभापती विनिता कोरे, कृषी सभापती अशोक बडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.अंगणवाडी सेविकांना वितरीत करण्यात येणाऱ्या या मायक्र ो-एसडी कार्डामध्ये महिला व बालकुपोषणविरुद्ध लढण्यासाठी चार शैक्षणिक व्हिडीओ आहे. हे कार्ड कोणत्याही प्रकारच्या मोबाइलमध्ये बसवून त्याद्वारे मुलांमध्ये तसेच त्यांच्या पालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करणार आहे.अंगणवाडी सेविकांना आध्यात्मिक पद्धतीने मानसिक व शारीरिकदृष्ट्या कुपोषणावर मात करण्यासाठीचे प्रशिक्षण पुढील महिन्यात सर्व अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे. मार्च २०१७ पर्यंत सर्व अंगणवाड्या स्मार्ट होतील व त्या कुपोषणमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले व त्यांचे सहकारी नागेंद्र कुमार, जिल्हा परिषद पालघरमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) प्रकाश देवऋषी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.व.बा.) राजेंद्र पाटील तसेच अधिकारी कर्मचारी मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.>‘पोषण’ या कार्यक्र मांतर्गत ही जनजागृती मोहीम राज्यात पालघरसह ठाणे व पुणे जिल्ह्यात राबविली जाणार असून हे शैक्षणिक साहित्य ५२ लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सर्व कामात अंगणवाडी सेविकांचे महत्त्वपूर्ण कार्य असून आपण सदैव अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी उभ्या राहू, अशी ग्वाही सुरेखा थेतले यांनी याप्रसंगी दिली.