शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राकाँची आघाडी बदलू शकते समीकरण

By admin | Updated: January 24, 2017 22:44 IST

अकोला : अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली तर भाजप आणि शिवसेनेला याचा फटका बसणार आहे.

अकोला : अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली तर भाजप आणि शिवसेनेला याचा फटका बसणार आहे. सोबतच समविचार पक्ष असलेल्या युडीएफ, भारिप-बमसं, आणि एमआयएम सारख्या पक्षांना अपयशाचे घोट पचवावे लागणार आहे.अकोला महापालिकेची तिसरी निवडणूक यंदा होऊ घातली आहे. विसही प्रभागांची भौगिलीक रचना बदलल्याने मतदारांची वाढ झाली आहे. कमी वेळात हजारो मतदारांपर्यंत पोहोचावे लागत असल्याने नगरसेवकांची चांगलीच दमछाक होत आहे. पक्षाचे उमेदवारच एकामेकांना साथ देऊन हा भार उचलणार आहेत. त्यामुळे एकटयाची ताकद कमी पडणार आहे. भाजपची तगडी स्थिती पाहून राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान काँग्रेसनेही अनुकूल स्थिती दर्शविली. मुंबईत वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली तर अकोल्यातील आघाडी मजबूत होणार आहे. भाजप-सेना युतीला स्वतंत्रपणे ताकद लावावी लागणार आहे. यामध्ये भाजप तरणार असली तरी त्याचा फटका सेनेला जास्त बसण्याची शक्यता आहे. आघाडीचा फायदा अकोला महानगरातील ८ मुस्लिम प्रभागात जास्त दिसून येईल. मात्र जे नगरसेवक काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नुकताच राष्ट्रवादीत आले. त्यांना या आघाडीमुळे सोबत प्रचार करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी तर या उमेदवारांना पक्षाचे तिकिटही मिळते की नाही अशी स्थिती झाली आहे. त्यातून जर वितुष्ट निर्माण झाले तर आघाडीला ही निवडणूक तारक ऐवजी मारक ठरणार आहे. मुंबईच्या बैठकीत आघाडीचा निर्णय काय होतो, याकडे अकोल्यातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांचे लक्ष लागून आहे.