शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

रंगारंग पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार ‘या’ सेलिब्रेटींच्या फॅशनचा जलवा

By admin | Updated: January 30, 2017 03:48 IST

कॉटनकिंग प्रस्तुत ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डचे आयोजन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी इंडिया लिमिटेड आहेत.

मुंबई : कॉटनकिंग प्रस्तुत ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डचे आयोजन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी इंडिया लिमिटेड आहेत. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील. मात्र, ‘लोकमत’च्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास असणार आहे. कारण मोस्ट स्टायलिश पर्सनालिटिजना या पुरस्काराचे मानकरी होता येणार आहे. या पुरस्कार सोहळ््याला हँडसम हंक हृतिक रोशन हजेरी लावणार आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी नवीन लूकमध्ये तो पाहायला मिळेल. या वेळी तो स्पोर्टी नाही, तर डॅशिंग लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. ब्लेझर लूकमध्ये हृतिक या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावणार आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात सोनम कपूरने डेनिम साडी परिधान करत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा ती अशाच हटक्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. या वेळी ती डिसेंट लूक असलेला वनपीस परिधान करून सगळ्यांना आपल्या अंदाजाने घायाळ करणार आहे. मराठमोळी मुलगी अभिनेत्री सई ताम्हणकरही या सोहळ्यावेळी हजेरी लावणार आहे. त्यामुळे या सोहळ्यावेळी तिची स्टाईल कशी असणार, याचीही साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. तर यासाठी तिने विशेष तयारी केली आहे. या वेळी ती आपल्याला इंडोवेस्टर्न आउटफिटमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे हटके स्टाईल करत, इतर सेलिब्रेटीसुद्धा आपल्या स्टायलिश लूकने या सोहळ्याला चारचाँद लावणार आहेत. वेस्टर्न आउटफिटमध्ये राधिका आपटे स्वत:ला प्रेझेंट करताना दिसेल. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होममिनिस्टर म्हणजेच अमृता फडणवीस, युथ आयकॉन असलेले शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहेत. (प्रतिनिधी)