शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यात रंगला पत्त्यांचा डाव, व्हिडीओ क्लीप व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 02:13 IST

ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 7 : शांतिनगर पोलीस ठाण्यात चालणाऱ्या पत्त्याच्या डावाची  व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्याने शहर पोलीस दलात ...

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 7 : शांतिनगर पोलीस ठाण्यात चालणाऱ्या पत्त्याच्या डावाची  व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यासंबंधाने पोलीस अधिकाऱ्यांकडून क्लीपसंदर्भातील वृत्ताला दुजोरा न मिळाल्याने उलटसुलट चर्चेलाही उधाण आले आहे.गुन्हेगार आणि अवैध धंद्यांची बजबजपुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लकडगंज पोलीस ठाण्याचे विभाजन करून वर्षभरापूर्वी शांतिनगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगार आणि अवैध धंदे करणाऱ्यांची भरमार आहे. हप्तेखोरीसाठी चटावलेले ठाण्यातील काही पोलीस अधिकारी आणि काही कर्मचारीही कुख्यात आहेत. त्यामुळे हे पोलीस ठाणे नेहमीच चर्चेचा विषय ठरते. या पार्श्वभूमीवर, पोलीस ठाण्यात चक्क पत्त्यांचा डाव रंगतो, अशी काही दिवसांपासून चर्चाही होती. मात्र त्यासंबंधाचे पुरावे नसल्याने कुणी या चर्चेवर विश्वास ठेवत नव्हते. परंतु शांतिनगर पोलीस ठाण्यात पत्त्यांचा डाव सुरू असल्याची क्लीप रविवारी व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या क्लीपमध्ये ठाण्यातील चार कर्मचारी ताशपत्त्यावर डाव खेळताना दिसतात. या क्लीपमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. यासंबंधाने सविस्तर माहितीसाठी लोकमतने वरिष्ठांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. 

 

जुगार नव्हे विरंगुळा यासंबंधाने पोलीस ठाण्यातील दुसऱ्या (जुगाराशी संबंध नसलेल्या) अधिकारी-कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी पत्ते खेळले जात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, येथे पैशाची बाजी लावली जात नाही. तणाव हलका करण्यासाठी मनोरंजनाचे दुसरे साधन नसल्याने काही जण बसल्या बसल्या ताशपत्ते खेळतात. हा जुगार नव्हे तर विरंगुळा असल्याचे त्यांनी सांगितले.