शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
4
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
7
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
8
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
9
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
10
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
11
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
12
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
13
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
14
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
15
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
16
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
17
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
18
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
19
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
20
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती

कर्नल महाडिक यांचे पार्थिव साताऱ्यात

By admin | Updated: November 19, 2015 00:39 IST

पोगरवाडीत आज अंत्यसंस्कार : गोडोलीतील निवासस्थानी शोकाकुल सातारकरांची रीघ

सातारा : काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेवर दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांचे पार्थिव बुधवारी रात्री उशिरा साताऱ्यात दाखल झाले आणि कुटुंबीयांसह मित्रमंडळींनी टाहो फोडला. पोगरवाडी (ता. सातारा) या महाडिक यांच्या जन्मगावी आज, गुरुवारी सकाळी महाडिक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कर्नल संतोष महाडिक (घोरपडे) हे कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांची शोधमोहीम सुरू असताना शहीद झाल्याचे वृत्त समजल्यापासूनच सातारा येथील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. बुधवारी दिवसभर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पार्थिव पुण्यातून निघण्यास रात्रीचे आठ वाजले. कर्नल संतोष महाडिक यांच्या मातोश्री, बहीण आणि कुटुंबातील महिलांच्या डोळ्यांतील धारा थांबत नव्हत्या. कर्नल संतोष यांना दत्तक घेणारे त्यांचे १०४ वर्षांचे आजोबा हे वृत्त ऐकून सुन्न झाले होते. पुण्याहून पार्थिव येण्याची वेळ लांबत गेली तसतसा नातेवाइकांच्या संयमाचा बांध क्षीण होत गेला. हंबरडे आणि सांत्वनाचे शब्द यांनी गोडोली येथील त्यांच्या घराचा परिसर व्यापून गेला होता. स्थानिक पोलीस, अधिकारी आणि कर्मचारी अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात गुंतले होते. घराबाहेरील छोट्याशा अंगणात फुलांनी सजवलेले टेबल ठेवण्यात आले होते. आजूबाजूच्या इमारतींच्या टेरेसवरही प्रचंड गर्दी झाली होती. आजूबाजूला हॅलोजन लावून परिसर प्रकाशमय करण्यात आला होता. गोडोली नाका ते रहिमतपूर या मुख्य रस्त्यापासून कर्नल महाडिक यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. एकाचवेळी शोक आणि अभिमान अशा संमिश्र भावना चेहऱ्यावर घेऊन नागरिक परिसरात तासन्तास उभे राहिले होते. रात्री १०.३५ च्या सुमारास पार्थिव गोडोली येथील निवासस्थानी आले. पार्थिवासोबत पालकमंत्री विजय शिवतारे होते. कुटुंबीय आणि इतर नातेवाइकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर अन्य नागरिकांना अंत्यदर्शनासाठी सोडण्यात आले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंह राजे, जिल्हाधिकारी अश्विनी मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, नगराध्यक्ष विजय बडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित बापट यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सुमारे दोन तास नागरिकांसाठी पार्थिव त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. आज, गुरुवारी सकाळी लवकर पार्थिव पोगरवाडीला नेण्यात येईल. तेथे संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. (प्रतिनिधी) पार्थिव पाहताच आक्रोश रात्री उशिरा पार्थिव घेऊन येणारा मोटारींचा ताफा महाडिक यांच्या निवासस्थानी पोहोचताच गगनभेदी हंबरड्यांनी परिसर व्यापून टाकला. पोलिसांनी सर्व प्रथम कुटुंबीयांना अंत्यदर्शन घेता यावे म्हणून अंगणाच्या बाहेर अडथळे लावले होते. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सातत्याने झटत होते. कुटुंबीयांनी कर्नल महाडिक यांचे पार्थिव पाहताच केलेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला घरे पाडणारा होता. महाडिक यांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्य शासन उचलणार : मुख्यमंत्री शहीद संतोष महाडिक यांच्या पार्थिवाचे पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शहीद महाडिक यांच्या कुुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी राज्य शासन उचलणार असल्याचे सांगितले.