शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एसटी देणार खासगी बस सेवेला टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 05:36 IST

सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येन लोक प्रवास करतात. या कालावधीत खासगी लक्झरी बसकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारीही होतात. ही प्रवासी लूट थांबविण्यासाठी आणि एसटीचे भारमान वाढविण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सीएसएमटी आणि क्रॉफर्ड मार्केट येथून एसटी बस सोडण्यासाठी चाचपणी करत आहे.

महेश चेमटे  मुंबई : सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येन लोक प्रवास करतात. या कालावधीत खासगी लक्झरी बसकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारीही होतात. ही प्रवासी लूट थांबविण्यासाठी आणि एसटीचे भारमान वाढविण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सीएसएमटी आणि क्रॉफर्ड मार्केट येथून एसटी बस सोडण्यासाठी चाचपणी करत आहे. खासगी लक्झरी बसला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळातील वातानुकूलित बस येथून सोडण्यात येणार आहेत.गणेशोत्सवादरम्यान कोकण मार्गासह राज्यभरात मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. शहरातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांतील प्रवासी संख्यादेखील लक्षणीय आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी एसटीने तब्बल २ हजार २१६ जादा बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.या जादा बस चालविण्यासाठी या बसच्या फेºयांचे नियोजन सुरू केले आहे. यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट, कुलाबा आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना एसटीच्या प्रवासासाठी मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला गाठावे लागते. त्यात अधिकचा वेळही लागतो, शिवाय सामानाची ओझी बाळगणे जिकिरीचे ठरते. त्यामुळे प्रवासी खासगी लक्झरी बसना प्राधान्य देतात. याचाच फायदा घेत, लक्झरी बस चालकांकडून प्रवाशांची लूबाडणूक होत असल्याच्या घटना घडतात. परिणामी, एसटी प्रशासन खासगी बसला टक्कर देण्यासाठी सीएसएमटी आणि क्रॉफर्ड मार्केट येथून बस सोडण्याच्या पर्यायांची चाचपणी करतआहे. ही सोय झाल्यास दक्षिण मुंबईतून एसटीने प्रवासकरणाºया प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे.रहदारी पाहून वेळापत्रकएसटी प्रशासन सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशेजारील बेस्टच्या आगारातील मोकळ्या जागेतून एसटी सोडण्यासाठी चाचपणी करत आहे. ही एसटी पुणे-सातारा या मार्गावर धावणार आहे. कोकण मार्गातील प्रवाशांसाठी क्रॉफर्ड मार्केट येथूनही एसटी सोडण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या जागेवरील वाहतुकीची रहदारी पाहता, दिवस आणि वेळ निश्चित करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.