शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जागा भरण्यासाठी महाविद्यालयांची कसरत; सर्वांना मिळणार प्रवेश

By admin | Updated: June 28, 2016 04:00 IST

अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेनंतरही सुमारे ४७ हजार ६४८ जागा रिक्त राहण्याची भीती मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाने व्यक्त केली

मुंबई : अकरावीच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेनंतरही सुमारे ४७ हजार ६४८ जागा रिक्त राहण्याची भीती मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाने व्यक्त केली आहे. यंदा अकरावी आॅनलाईन प्रवेशासाठी एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र मुळात अकरावी प्रवेशासाठी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये २ लाख ६९ हजार १७२ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे अकरावीच्या सुमारे ४७ हजार ६४८ प्रवेशाच्या जागा यंदाच्या शैक्षणिक वर्षात रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे सर्व विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश मिळणार, ही पालकांसाठी आनंदाची बाब म्हणता येईल. रिक्त जागा भरण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नव्या महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या भरण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.कोट्यातील ४३,४९९ जागा समर्पितअकरावी प्रवेशासाठी आॅनलाईनच्या १ लाख ४९ हजार ८०८ जागांसोबत इनहाऊस, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन कोट्यातील एकूण १ लाख १९ हजार ३६४ जागा उपलब्ध होत्या. मात्र कोट्यातील एकूण जागांपैकी ४३ हजार ४९९ जागा आॅनलाईनसाठी समर्पित आहेत. समर्पित जागांत इनहाऊसच्या १० हजार ७१७, अल्पसंख्यांकच्या ३१ हजार २० आणि व्यवस्थापन कोट्यातील १ हजार ७६२ जागा आहेत. त्यामुळे आत्ता आॅनलाईनसाठी उपलब्ध जागांची संख्या २ लाख ६९ हजार १७२ इतकी झाल्याचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले....तर ५० हजार जागा रिक्त अकरावी प्रवेशासोबतच अनेक विद्यार्थी आयटीआय आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यात कोट्यातून प्रवेश मिळवलेल्या २८ हजार २३७ विद्यार्थ्यांचे नाव आॅनलाईनच्या पहिल्या कट आॅफमध्येही लागले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी प्रवेश घ्यावा लागेल. त्यामुळे अकरावीच्या रिक्त जागांची संख्या ५० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)