शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्टोकारच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थी ठार

By admin | Updated: March 20, 2017 17:27 IST

एक जण गंभीर जखमी; कारचालक महिलेवर गुन्हा दाखल

नाशिक : भरधाव अल्टोकारच्या धडकेत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़२०) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास आडगाव नाक्यावरील स्वामी नारायण शाळेजवळ घडली़ मयत विद्यार्थ्याचे नाव मनोज सुभाष बाविस्कर (१९, रा़चव्हाण मळा, साईप्रेम हॉटेलशेजारी, तपोवन, नाशिक) तर जखमी विद्यार्थ्याचे नाव विशाल पालवे (रा़ चव्हाण मळा, तपोवन, नाशिक) असे आहे़ या अपघात प्रकरणी कारचालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामी नारायण मंदिराजवळील हॉटेल साईप्रेम रस्त्यावर मनोज बाविस्कर व त्याचा विशाल पालवे हे दोघे आपल्या अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, ईएन ८३६२) जवळ उभे होते़ त्यावेळी भरधाव आलेल्या अल्टोकारने (एमएच १५,ईपी १३७७) या दोघांना जबर धडक दिली़ यामध्ये मनोज बाविस्कर हा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या संरक्षण जाळीवर फेकला गेला़ संरक्षण जाळी मानेत घुसल्याने तसेच डोक्यावर आघात झाल्याने मनोज हा गंभीर जखमी झाला़ त्यास अशोक कापसे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉग़ायकवाड यांनी तपासून मयत घोषीत केले़ तर दुसरा जखमी पालवेवर उपचार सुरू आहेत़या अपघातात मृत्युमुखी पडलेला मनोज बाविस्कर हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या के़टी़एच़एम महाविद्यालयात शिक्षण घेत असून बारावीचे पेपर देत होता़ त्याच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे़ या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अल्टो कारचालक महिला राजश्री राहुल महाजन (रा़हिरावाडी़ पंचवटी,नाशिक) विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे़या अपघाताचा अधिक तपास पोलीस हवालदार डी़पी़भालेराव करीत आहेत़ (प्रतिनिधी)