शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेज विद्यार्थ्याची प्रेमप्रकरणातून हत्या

By admin | Updated: January 25, 2017 04:13 IST

पूर्वेतील सागर्ली येथील साउथ इंडियन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणाची प्रेमप्रकरणातून मंगळवारी दुपारी १२.३०च्या सुमारास कॉलेजबाहेरच शस्त्राने भोसकून हत्या

डोंबिवली : पूर्वेतील सागर्ली येथील साउथ इंडियन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तरुणाची प्रेमप्रकरणातून मंगळवारी दुपारी १२.३०च्या सुमारास कॉलेजबाहेरच शस्त्राने भोसकून हत्या केली. प्रणय सुरेश मोरे (२०, रा. जलाराम आशिष बिल्डिंग, गुप्ते रोड, डोंबिवली पश्चिम) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. दोन तरुणांनी ही हत्या केली असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी दिली.प्रणय साउथ इंडियन कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रथम वर्षाला शिकत होता. कॉलेज सुटल्यानंतर मंगळवारी दुपारी तो मित्रांसह कॉलेजच्या इमारतीजवळ बोलत उभा होता. त्या वेळी तेथे आलेल्या दोन तरुणांनी बोलण्याचे निमित्त सांगून त्याला बाजूला नेले. बाजूला नेल्यानंतर तेथेच त्यांनी त्याच्या डोक्यात, पोटात, पाठीत, हातावर शस्त्राने नऊ वार केले. हा हल्ला केल्यानंतर हे मारेकरी पसार झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रणयला मित्रांनी जिमखान्याजवळील खासगी रुग्णालयात तातडीने दाखल केले. मात्र, रक्तस्राव खूप झाल्याने त्याचा उपचारादरम्यान काही वेळातच मृत्यू झाला. प्रणयवर हल्ला झाल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरताच त्याला पाहण्यासाठी रुग्णालयाबाहेर त्याच्या मित्रांनी आणि नातेवाइकांनी गर्दी केली होती. मानपाडा पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून दोन अनोळखी तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला.प्रणयचे आई आणि वडील दोघेही खासगी कंपनीत कामाला आहेत. लहान भाऊ निशांत शिक्षण घेत आहे. ‘दोनच दिवसांपूर्वी मी कॉलेजमध्ये पालकसभेला येऊन गेलो. मात्र, असे काही घडेल याची कोणतीच कल्पना आली नाही,’ असे त्याचे वडील सुरेश मोरे यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)