शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांची शासनाकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 01:02 IST

नापासांचा शिक्का पुसण्यासाठी प्रथमच घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत राज्यातून ३२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

पुणे : नापासांचा शिक्का पुसण्यासाठी प्रथमच घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत राज्यातून ३२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश राज्यातील महाविद्यालयांकडून राज्य शासनाकडे जागा वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.फेरपरीक्षेच्या निकालात राज्यभरातून ३२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे विभागात ६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश देताना महाविद्यालयांना वेगळे नियोजन करावे लागेल. बहुतांश महाविद्यालयांतील प्रवेश फुल झाल्याने प्रवेशाच्या अडचणी वाढल्या आहेत. यावर उपाय म्हणून महाविद्यालयांनी जागा वाढवून देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. याबाबत शासनाकडून काय प्रतिसाद येतो, याकडे लक्ष लागले आहे. उच्च शिक्षण विभागाकडूनही विद्यापीठांना सूचना न मिळाल्याने प्रवेशप्रक्रिया खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रथम वर्षाची महाविद्यालये सुरू होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला आहे. उच्च शिक्षण विभागाने ऐन वेळी विद्यापीठांना सूचना देऊन ऐन वेळी पुरवणी परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशप्रक्रिया राबवा, अशा सूचना देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विलंबाने प्रवेश घेणाऱ्या या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांना पेलावी लागणार आहे. त्यामुळे महाविद्यालयांनीच तातडीने जागा वाढविण्यासाठी शासनालाच साकडे घातले आहे.महाविद्यालयाने नियमित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण केले आहेत. फेरपरीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे लागणार आहे. यासाठी आम्ही शासन आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत. या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा असेल, तर शासनाने जागा वाढवून द्यायला हव्यात. तसे पत्र शासनाला पाठविण्यात आले आहे. शासनाकडून प्रतिसाद येईपर्यंत प्रवेशप्रक्रिया राबविता येणे शक्य नाही. - प्रा. दिलीप सेठ, प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय