शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात गोळी झाडून घेत महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या

By admin | Updated: April 16, 2017 16:35 IST

बारामती एमआयडीसी परीसरातील सुर्यनगरी येथे मानसिक नैराश्यातून एका महाविद्यालयीन युवतीने रिव्हॉल्व्हर ने स्वत:वर गोळी

ऑनलाइन लोकमतबारामती, दि. १६ -  आपल्यावर कोणी प्रेमच करत नाही माझे लाड केले जात नाही. या नैराश्यातून बारामती एमआयडीसी परीसरातील सूर्यनगरी येथे मानसिक नैराश्यातून एका महाविद्यालयीन  युवतीने रिव्हॉल्व्हर ने स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेत युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि १५)  रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बारामती ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या उर्फ सायली मानसिंग बळी (वय १७) असे या महाविद्यालयीन युवतीचे नाव आहे. ती सूर्यनगरी येथील सुधांगण बिल्डींगमध्ये भाऊ आणि आईसमवेत वास्तव्यास  आहे.  शनिवारी रात्री स्वत:वर गोळी झाडून घेत तिने आत्महत्या केली. याबाबत तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक  प्रशांत काळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले की, गेल्या वर्षी सायली तिची आई व भावासह बारामतीत महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आलेले होते. ती ११ वी उत्तीर्ण झालीआहे. यापूर्वी ती पंजाबमध्ये शिकायला होती.

आपल्यावर कोणी प्रेमच करत नाही माझे लाड केले जात नाही. या नैराश्यातून तिने हे कृत्य केल्याचे काळे यांनी नमूद केले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने  लिहिलेल्या चिठ्ठीत ही बाब उघड झाली आहे. सायली हिचे वडील सैन्यात कार्यरत असून ते कर्तव्य बजावत आहेत. ते सिक्कीम येथे हवालदार पदावर कार्यरत आहेत. या घटनेनंतर ते बारामतीला येण्यासाठी निघाले आहेत. सायली हिने आत्महत्या करण्यासाठी वापरलेले रिव्हॉल्व्हर विनापरवाना आहे. अवैध रिव्हॉल्व्हर सायलीकडे कोठून आले, याबाबत तिच्या कुटुंबियांकडेच तपास करावा लागणार आहे.त्यानंतरच याबाबत  माहिती मिळू शकणार आहे.

पोलीस तपास सुरू आहे.त्यामध्ये इतर माहिती समजणार आहे,असे काळे यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सायली बळी हिने घरात असलेल्या गावठी कट्ट्यातून कपाळाच्या मध्यभागी एक गोळी मारुन घेतली. ही गोळी तिच्या कपाळातून आरपार जाऊन बाहेर पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.तिची आई भारती यांनी तिला उपचारासाठी रुई रुग्णालयात नेले.मात्र, तत्पूर्वीच सायलीचा मृत्यू झाला होता.