शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालगावचे लाचखोर अपर जिल्हाधिकारी ताब्यात

By admin | Updated: August 7, 2015 01:16 IST

जमीन व्यवहारात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ३५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारे मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र बापूराव

नाशिक : जमीन व्यवहारात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ३५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारे मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र बापूराव पवार व त्यांचा खासगी सहकारी दिनेशभाई पंचासरा या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ताब्यात घेतले.लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी पवार यांच्या शासकीय कार्यालयाला सील ठोकले, तर सायंकाळी मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या समोर असलेल्या त्यांच्या निवासाचीही झडतीघेऊन तेथून काही कागदपत्रे ताब्यात घेतली. कासारी (ता. नांदगाव) व नाशिक येथील काही नागरिकांनी नांदगाव तालुक्यातील दोन गावांमधील सुमारे ७५ एकर ८५ गुंठे जमीन खरेदी केली होती. परंतु ही जमीन ही नवीन शर्तींची म्हणजेच मूळ मालकाला शासनाने काही अटी, शर्तींवर दिली होती व अशी जमीन हस्तांतरण करताना विभागीय आयुक्तांची अनुमती घेऊन शासनाच्या तिजोरीत नजराणा भरावा लागतो. परंतु मूळ मालकाने व नंतर जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तींनी असा व्यवहार करताना कोणतीही अनुमती घेतली नाही, असे पवार यांचे म्हणणे होते व त्यापोटी त्यांनी जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तींना मे महिन्यात नोटीस बजावून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पवार यांचा सहकारी दिनेशभाई लालजीभाई पंचासरा याने २७ मे रोजी जमीन मालकांची भेट घेऊन प्रकरण मिटविण्यासाठी पवार यांनी आपल्याला पाठविल्याचे सांगितले व कारवाई टाळायची असेल तर ५० लाखांची मागणी केली होती. मात्र नंतर ३५ लाख रुपयांवर सौदा ठरला.