शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कोसळधार !

By admin | Updated: July 4, 2016 05:14 IST

शनिवारी धो-धो कोसळलेल्या पावसाने रविवारी मात्र किंचितशी विश्रांती घेतली.

मुंबई : शनिवारी धो-धो कोसळलेल्या पावसाने रविवारी मात्र किंचितशी विश्रांती घेतली. दुपारी आणि सायंकाळी काही काळ पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचे प्रमाण कमी होते. ठाणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची रविवारीही जोरदार हजेरी कायम होती. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १३७ मिमी पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ११७.८४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रविवारी अंबा आणि कुंडलिका या दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची पातळी कमी झाली. नवी मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारी कमी झाला असला तरी संततधार सुरूच होती. मुंबईत ऐन रविवारी पावसाने विश्रांती घेतल्याने घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांनी रविवारच्या सरींचा मनमुराद आनंद लुटला. तर दुसरीकडे अधून-मधून पावसाची सरी कोसळत असतानाच पडझडीच्या घटनाही घडल्या. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झाली नाही. रविवारी झालेल्या पावसाची मुंबई शहरात ८.२६, पूर्व उपनगरात १२.७६ आणि पश्चिम उपनगरात १२.६० नोंद झाली आहे. मागील २४ तासांत पडलेल्या पावसामुळे शहरात ३, पूर्व उपनगरात ५ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १२ ठिकाणी भिंतीचा भाग पडला. शहरात ७, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात २४, पूर्व उपनगरात २२ आणि पश्चिम उपनगरात ५८ अशा एकूण १०४ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी महापालिका नियंत्रण कक्षाकडे आल्या. दरम्यान, कांदिवली पश्चिमेकडील डॉ. बी.ए. रोडवरील सहयाद्री नगर येथे झाडे कोसळून झालेल्या दुर्घटनेत रिक्षाचालकासह महिला जखमी झाली. राजकुमार सिंग आणि शोभना पटेल अशी जखमींची नावे आहेत.ठाणे जिल्ह्यात दुपारनंतर पुन्हा संततधार सुरू झाली. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड आणि भिवंडीमध्ये पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यात एकूण ९५८.२० मिमी पाऊस झाला आहे. यामध्ये ठाणे तालुक्यात १३२, कल्याण- १२२, मुरबाड- १५३, उल्हासनगर-१४८, अंबरनाथ- १४२.२०, भिवंडी- १७० आणि शहापूर- ९१ मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. रविवारी दुपारपर्यंत ठाणे शहर ३७.५० मिमी पावसाची नोंद झाली. मुंब्य्रातील रेतीबंदर येथील राणानगर १, शंकर मंदिराजवळील राजन मारु ती पवार यांच्या घरावर डोंगरावरून भले मोठे दगड घसरून पडले. या घटनेत, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. >रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. पाली तालुक्यात सर्वाधिक २३४ मि.मी. पाऊस पडल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. रोहे आणि माथेरानमध्ये अनुक्रमे १८६ आणि १२३ मि.मी. पावसाची नोंद झाली. फणसाड, वावा, सुतारवाडी, कोंडगाव, कवेळे, उन्हेरे, कुडकी, संदेरी, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे या लघुपाट बंधारे प्रकल्पाची अखत्यारीत असणारी धरणे दुथडी भरून वाहत आहेत. उर्वरित असणारी १६ धरणेही भरण्याच्या स्थितीमध्ये आहेत. पनवेल परिसरात मात्र पावसाचा जोर आजही कायम असल्याने हार्बर मार्गावरील गाड्या उशीराने धावत होत्या. सायन-पनवेल महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्याने गैरसोय झाली. >अनेक जलाशय भरू लागलेपुणे जिल्ह्यातील मुळशी, पवना, कासारसाई, कलमोडी, भामाआसखेड आदी धरण क्षेत्रांत संततधार सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सांगली जिल्ह्यात रिमझिम सुरू असून, चांदोली धरणातील पाणी पातळी वेगाने वाढत आहे.कोयना धरणाच्या पाणी पातळीत दोन टीएमसीने वाढ झाली आहे. नगर जिल्ह्यात भंडारदरा धरणात २४ तासांत जवळपास २२५ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. निळवंडे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. सर्वदूर पाऊस असल्याने शेतकरी २५ जुलैपर्यंत पेरण्या उरकू शकतो. या पावसामुळे जमिनीत ओल उतरत आहे़ त्यामुळे तो शेतीला उपयुक्त आहे. ओढे, नाले वाहू लागल्याने विहिरींनाही पाणी उतरेल.- रामचंद्र साबळे, कृषी हवामानतज्ज्ञ>पाऊसमान (मि़मी़) : पुणे ७३.५, नाशिक ५८.०६, रतनवाडी (नगर) १२७, गगनबावडा (कोल्हापूर) १०९, कोयना (सातारा) १५६, चांदोली (सांगली) ७०, भंडारा ३५, अमरावती २९.७>काहीशी चिंता : मराठवाडा तसेच सातारा, सांगली व नगरच्या पूर्व भागात मात्र अजून चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागात काहीशी चिंता आहे.