शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणामुळे सहकार चळवळीचा ऱ्हास - उपराष्ट्रपती

By admin | Updated: July 8, 2016 21:05 IST

एकेकाळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहकारी चळवळ मागे पडू लागली आहे. सहकारी चळवळ मूळ उद्दीष्टांपासून भरकटली असून सरकारच्या उद्दीष्टपूर्तीची साधन झाली आहे

उपराष्ट्रपती मो.हामिद अन्सारी : नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या ५५ वा स्थापना दिन साजरानागपूर : एकेकाळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहकारी चळवळ मागे पडू लागली आहे. सहकारी चळवळ मूळ उद्दीष्टांपासून भरकटली असून सरकारच्या उद्दीष्टपूर्तीची साधन झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहकार क्षेत्राचा राजकीय फायद्यासाठी वापर वाढला आहे. राजकारणामुळे सहकारी चळवळीचा ऱ्हास होत आहे, असे परखड मत देशाचे उपराष्ट्रपती मो.हामिद अन्सारी यांनी व्यक्त केले. नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या ५५ व्या स्थापना दिवस समारंभादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.देश घडवणाऱ्या नेत्यांनी सहकारी चळवळीकडे वेगाने आर्थिक विकास करण्याचे साधन म्हणून बघितले होते. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काही दशकांत देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचा मौलिक वाटा होता. महाराष्ट्राने तर या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. परंतु त्यानंतर सहकार क्षेत्रातून काही ठराविक व्यक्तींनाच फायदा होत गेला. तळागाळातील सहकार कमकुवत होत गेला. आर्थिक उदारीकरणानंतर खासगीकरणाचे सहकारासमोर मोठे आव्हान उभे ठाकले. त्यातच प्राथमिक स्वरूपाच्या कृषी पतसंस्थांकडील साधनसामुग्रीची उणीव, व्यावसायिक व्यवस्थापन कौशल्याचा अभाव यामुळे सहकार क्षेत्र आणखी माघारत गेले, असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले. महाराष्ट्रात राजकीय नेत्यांमुळे सहकारी चळवळ चांगलीच फोफावली व सहकारी क्षेत्राने प्रचंड प्रगती केली. परंतु गुजरात, कर्नाटक वगळता देशाच्या इतर राज्यांत हे चित्र दिसले नाही. वंचितांचे जीवन सुधारण्यासाठी सहकारी बँकांनी मोठे योगदान दिले आहे. काही मोजक्या बँकांमुळे सहकारी बँकांबाबत गैरसमज आहेत. परंतु देशाच्या विकासात या क्षेत्राची मौलिक भुमिका आहे. रोजगार निर्माण करणाऱ्या आर्थिक धोरणाचा स्विकार करण्याची आमची भुमिका आहे, असे गडकरी म्हणाले. नागपुरातच देशाचे केंद्रब्रिटीशांच्या काळात नागपूर देशाच्या केंद्रस्थानी होते. आता देशाचे भौगोलिक केंद्र थोडे वेगळे असले तरी लोक नागपुरलाच खरे केंद्र मानतात असे प्रतिपादन उपराष्ट्रपतींनी केले. त्यांचा रोख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे असल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. विशेष म्हणजे संघाचे अनेक स्थानिक पदाधिकारी यावेळी श्रोत्यांमध्ये उपस्थित होते..