शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

राज्यात थंडीची लाट कायम

By admin | Updated: December 26, 2015 01:43 IST

राज्यातील थंडीचा कडाका वाढत असून नाशिकमध्ये हंगामातील निचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये तापमानात सरासरीपेक्षा ४.६ अंशांनी घट झाली आहे.

पुणे : राज्यातील थंडीचा कडाका वाढत असून नाशिकमध्ये हंगामातील निचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिकमध्ये तापमानात सरासरीपेक्षा ४.६ अंशांनी घट झाली आहे.विदर्भातही थंडीची लाट आल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. ही लाट शनिवारीही कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही थंडी वाढली आहे. पुणे, गोंदिया, अकोला, परभणी, मालेगाव येथील तापमान ७ अंशापेक्षाही कमी नोंदले गेले.शुक्रवारी राज्यातील हवामान कोरडे होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे. गेल्यावर्षी नाशिकमध्ये २९ डिसेंबरला निचांकी ६.५ अंश तापमान नोंदले गेले होते. नाशिकला १३ डिसेंबर १९८१ मध्ये सर्वात कमी ४.७ अंश तापमानाची नोंद झाली होती. विदर्भात सर्व प्रमुख शहरांमधील तापमानात सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांनी घट झाली आहे. गोंदिया येथे ७.६, अकोला ८, नागपूर ८.१, ब्रह्मपुरी ९, वर्धा ९.६, तर अमरावतीत ११ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यातही परभणी येथे ८.२, औरंगाबाद ९.८, उस्मानाबाद ९.४, नांदेड ९.५ अंश सेल्सिअस असे तापमान होते. पुणेही गारठले असून तेथे ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मालेगावला ८, जळगाव ९.२, महाबळेश्वरला १०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. मंगळवारपर्यंत राज्यात थंडीला पोषक असणारे कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)