शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला शीतसाखळी टर्मिनल मार्केट

By admin | Updated: December 28, 2015 03:56 IST

केंद्र शासनाने देशात टर्मिनल मार्केट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती

नाशिक : केंद्र शासनाने देशात टर्मिनल मार्केट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात मुंबई, नाशिक व नागपूर येथे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली. राज्य अथवा केंद्रीय फलोत्पादन अभियानातून उत्तर महाराष्ट्रात सात शीतसाखळी टर्मिनल मार्केट उभारण्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र शासनाने फळे, भाजीपाला व इतर नाशवंत शेतमालाकरिता टर्मिनल मार्केटच्या उभारणीसाठी निविदाप्रक्रिया व खासगी उद्योजकांची निवड करण्यासंदर्भात एक समिती गठीत केली. त्या धर्तीवर राज्य शासनानेही अशी समिती गठीत करून कृषी पणन मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करून त्यांनी त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली टर्मिनल मार्केटचे काम करावयाचे आहे. त्याचप्रमाणे फळे व भाजीपाल्याकरिता स्वतंत्र शीतसाखळी स्थापन करण्यात आलेली असून, नाशिक विभागातील नाशवंत फळांकरिता व भाजीपाल्यांकरिता वातानुकूलित वाहने, प्रिकुलिंग कोल्ड स्टोअरेज, रायपनिंग चेंबर आदींचा आवश्यकतेप्रमाणे समावेश असलेल्या सात शीतसाखळ्या स्थापन करण्यात येणार आहेत. शेतकरी फॉर्म पॅक हाउसला माल आणतील व त्यावर प्राथमिक प्रक्रिया व पॅकिंग करून वातानुकूलित वाहनाने माल समूह केंद्रात आणला जाईल. त्यानंतर तो ग्रेडिंग-पॅकिंग करून प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअरेजला ठेवला जाईल व नंतर निर्यात केला जाईल, असे गोडसे यांनी सांगितले.प्रकल्पाकरिता सिद्धपिंप्री येथील १०० एकर जमिनीचा प्रस्ताव शसनाकडे २०१०मध्ये पाठविला होता. तो प्रलंबित होता. गोडसे यांनी मौजे वापगाव (ठाणे) व मौजे वारंगा (नागपूर) येथील धर्तीवर ही जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याबाबत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे मागणी केली आहे. (प्रतिनिधी)